नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली असून एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलीला शासनामार्फत एक लाख रुपये मदत मिळणार असून या योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत
मुलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे
लेक लाडकी योजनेचे फायदे | Lek Ladki Yojana Benefits
Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया
मुलीचा जन्म झाल्यावर | 5,000 हजार |
मुलगी पहिलीत गेल्यावर | 6,000 हजार |
मुलगी सहावीत गेल्यावर | 7,000 हजार |
मुलगी अकरावीत गेल्यावर | 8,000 हजार |
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर | 75,000 हजार |
एकुण मिळणार लाभ | 1,01,000 रू |
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) लाभार्थी चा जन्म दाखला.
2) उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)
3) लाभार्थीचे आधार कार्ड
4) पालकांचे आधार कार्ड
5) बँक पासबुक
6) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)
7) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)
लेक लाडकी योजना 2024 पात्रता व नियम | Lek Ladaki Yojana 2024 Eligibility Criteria
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.
1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल. त्याच मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
3) लेक लाडकी योजना 2024 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
4) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
5) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
6) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
7) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.
लेक लाडकी योजना फॉर्म व GR डाउनलोड करा | Lek Ladaki Yojna GR and PDF Form Download
लेक लाडकी योजनेचा अधिकृत शासन निर्णय व ऑफलाईन फॉर्म pdf download करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
लेक लाडकी योजना फॉर्म PDF Download करा | येथे क्लिक करा |
लेक लाडकी योजना शासन निर्णय GR Download | Download PDF |