Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती : मित्रानो सर्व परीक्षेत एखादा प्रश्न हा महाराष्ट्रातील अभयारण्य वर असतो . महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे . वन व प्राणी संवर्धन करणे काळाची गरज आहे. म्हणून सरकारने विविध अभयारण्य उभारले आहे .

Abhayaranya In Maharashtra
Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.

  • उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
  • उष्ण कटिबंधीय काटेरी वने
  • उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
  • समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
  • सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने

खालील तक्त्यात आपण अभयारण्याची नावे , जिल्हा व क्षेत्रफळ ची माहिती पाहणार आहोत

अ.क्रअभयारण्य/ राष्ट्रीय उद्यानाचे नावजिल्हाक्षेत्र (चौ.कि.मी)
अंबाबरवा अभयारण्यबुलढाणा१२७.११०
अंधारी अभयारण्यचंद्रपूर५०९.२७०
अनेर डॅम अभयारण्यधुळे८२.९४०
भामरागड अभयारण्यगडचिरोली१०४.३८०
भीमाशंकर अभयारण्यपुणे-ठाणे१३०.७८०
बोर अभयारण्यवर्धा-नागपूर६१.१००
चांदोली राष्ट्रीय उद्यानसांगली-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी३१७.६७०
चपराळा अभयारण्यगडचिरोली१३४.७८०
देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्यअहमदनगर२.१७०
१०ज्ञानगंगा अभयारण्यबुलढाणा२०५.२१०
११माळढोक अभयारण्य (पुनर्रचित)सोलापूर-अहमदनगर१२२९.२४
१२गौताळा औत्रमघाट अभयारण्यऔरंगाबाद-जळगाव२६०.६१०
१३गुगामल राष्ट्रीय उद्यानअमरावती३६१.२८०
१४जायकवाडी पक्षी अभयारण्यऔरंगाबाद-अहमदनगर३४१.०५०
१५कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यअहमदनगर३६१.७१०
१६कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यअकोला१८.३२१
१७कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्यरायगड१२.१५५
१८काटेपूर्णा अभयारण्यअकोला७३.६९०
१९कोयना अभयारण्यसातारा४२३.५५०
२०लोणार अभयारण्यबुलढाणा३.८३१
२१मालवण सागरी अभयारण्यसिंधुदुर्ग२९.१२२
२२मयुरेश्वर सुपे अभयारण्यपुणे५.१४५
२३मेळघाट अभयारण्यअमरावती७८८.७५०
२४नायगाव मयूर अभयारण्यबीड२९.९०१
२५नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यनाशिक१००.१२०
२६नरनाळा अभयारण्यअकोला१२.३५०
२७नवेगाव राष्ट्रीय उद्यानगोंदिया१३३.८८०
२८नागझिरा अभयारण्यभंडारा-गोंदिया१५२.८१०
२९पैनगंगा अभयारण्ययवतमाळ-नांदेड४२४.८९०
३०पेंच राष्ट्रीय उद्याननागपूर२५९.७१०
३१फणसाड अभयारण्यरायगड६९.७९०
३२राधानगरी अभयारण्यकोल्हापूर३५१.१६०
३३सागरेश्वर अभयारण्यसांगली१०.८७७
३४संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमुंबई( ठाणे)८६.९६५
३५ताडोबा राष्ट्रीय उद्यानचंद्रपूर११६.५५०
३६तानसा अभयारण्यठाणे३०४.८१०
३७टिपेश्वर अभयारण्ययवतमाळ१४८.६३२
३८तुंगारेश्‍वर अभयारण्यठाणे८५.७००
३९वान अभयारण्यअमरावती२११.००६
४०यावल अभयारण्यजळगाव१७७.५२०
४१ऐडशी रामलिंगघाट अभयारण्यउस्मानाबाद२२.३७४
४२मानसिंगदेव अभयारण्यनागपूर१८२.५८०
४३नवीन नागझिरा अभयारण्यगोंदिया-भंडारा१५१.३३५
४४नवेगाव अभयारण्यगोंदिया१२२.७५६
४५नवीन बोर अभयारण्यनागपूर६०.६९
४६नवीन माळढोक पक्षी अभयारण्यउस्मानाबाद०१.९८
४७भोरगड संवर्धन राखीव क्षेत्रनाशिक३.४९३
४८उमरेड करांडला अभयारण्यनागपूर-भंडारा१८९.२९
४९कोलामार्का संवर्धन राखीवगडचिरोली१८०.७२
५०ताम्हिनी अभयारण्यपुणे-रायगड४९.६२
५१कोका अभयारण्यभंडारा९७.६२४
५२मुक्ताई भवानी अभयारण्यजळगाव१२२.७४
५३न्यू बोर विस्तारित अभयारण्यवर्धा१६.३१
५४मामडापूर संवर्धन राखीवनाशिक५४.४६
५५प्राणहिता अभयारण्यगडचिरोली४२०.०६
५६सुधागड अभयारण्यरायगड-पुणे७७.१२८
५७ईसापूर अभयारण्ययवतमाळ-हिंगोली३७.८०३
Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

महाराष्ट्रातील अभयारण्य माहिती मराठीत – Abhayaranya In Maharashtra

कर्नाळा पक्षी अभयारण्य

See also मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द

रायगड जिल्ह्यातील एक पक्षी अभयारण्य.

गौताळा अभयारण्य

औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य.

चपराळा वन्यजीव अभयारण्य

गडचिरोली जिल्ह्यातील एक अभयारण्य.

जायकवाडी पक्षी अभयारण्य

जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती.

टिपेश्वर अभयारण्य

टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे.

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प

स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले.

ताम्हिणी अभयारण्य

ताम्हिणी अभयारण्य विषयक माहिती.

दाजीपूर अभयारण्य

कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

नरनाळा वन्यजीव अभयारण्य माहिती.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे.

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा…ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा… एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.

नागझिरा अभयारण्य

नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असुन “हिरवा ओएसिस” चे चमत्कारिकरित्या जतन करुन ठेवले आहे. जैव-विविधता संवर्धन या दृष्टिकोणातून देखील या अभयारण्याला अत्यंत महत्व आहे. हे अभयारण्य, निसर्गरम्य परिसराने, विलासीत हिरव्या वनस्पतींसह सुशोभित केले आहे. निसर्गाचे अन्वेषण आणि प्रशंसा करण्याच्या दृष्टिने हे अदभुत बाह्य मैदानीय नैसर्गीक संग्रहालय असे आहे. हे वन्यजीव अभ्यारण्य निसर्गाची अनमोल संपत्ती असुन, सर्वांनी निसर्गरम्य सुंदरतेचा, शुद्ध आणि ताज्या हवेचा आनंद घेण्यासाठी भेट देणे आवश्यक आहे. हे अभयारण्य आमच्यासाठी वरदान असे आहे आणि म्हणून आपल्याला निसर्गाच्या या भव्य संपत्तीचे खरे मूल्य लक्षात आले पाहिजे आणि आपल्या राष्ट्रीय परंपरेचा एक भाग म्हणून संरक्षण करणे आवश्यक आहे. जैव-विविधता संवर्धनाच्या दृष्टिने देखील या अभयारण्यात अफाट क्षमता आहे.

हे अभयारण्य, मध्य भारतात विशेषतः विदर्भातील महत्वाचे संवर्धन केंद्र आहे. हे मानवी वसाहती करीता “हरित-फुप्फुस” प्रमाणे कार्य करते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास सहायक असे आहे.

See also महाराष्ट्रचा भूगोल --- महाराष्ट्र नैसर्गिक सीमा.

नायगाव अभयारण्य

पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेलं तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पहायला मिळतात.

राधानगरी

निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे.

पेंच व्याघ्र प्रकल्प

या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे.

फणसाड अभयारण्य

निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

बोर व्याघ्र प्रकल्प

देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास हा प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे.

भामरागड अभयारण्य

चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभयारण्य.

ममदापूर संवर्धन राखीव

काळवीटांसाठी विकसित करण्यात आलेले ममदापूर संवर्धन राखीव.

मयुरेश्वर अभयारण्य

मयुरेश्वर अभयारण्य माहिती.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प

चंद्रपूर जिल्ह्यातील एक वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे.

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य.

महाराष्ट्रातील अभयारण्य pdf DOWNLOAD

Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य

माळढोकअभयारण्यहेमहाराष्ट्रातीलआकारमानानेसर्वात मोठे अभयारण्यआहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ. कि.

नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे

नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे

महाराष्ट्रात किती अभयारण्य आहेत

आपल्या राज्यात तब्बल 57अभयारण्येआणि ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर असे सहा व्याघ्र प्रकल्पआहेत.

1 thought on “Abhayaranya In Maharashtra – महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती”

Leave a Comment