ऑनलाइन आधार अपडेट 14 सप्टेंबर पर्यंत कोणतेही शुल्क नाही

ऑनलाइन आधार अपडेट : देशाच्या लोकसंख्या ची माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्ड वरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते तुमचे ओळखपत्र पुराव्याचा पत्ता आधी माहिती अपलोड करावी लागते ही कागदपत्र ऑनलाइन कोणतेही शुल्क न भरता 14 सप्टेंबर पर्यंत अपलोड करता येणार याआधी 14 जून पर्यंत दिलेला अवधी होता त्यानंतर पुन्हा वाढ दिली आहे

कागदपत्रे ऑनलाईन आधारची अपलोड कशी करावी

सर्वप्रथम यु आय डी आय च्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉगिन करा आधार नंबर टाकताच तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल ओटीपी टाकताच तुम्ही लॉगिन व्हा

त्यानंतर तुमचा दिसणारा फोटो व पत्ता तपासून पहा तुमचा तपशील बरोबर असेल तर मी पडताळणी करीत आहे की वरील माहिती बरोबर आहे या टॅब वर क्लिक करा

दिसणारा तपशील चुकीचा असेल तर ड्रॉप डाऊन मेनू मधून अपलोड करावयाच्या कागदपत्रांवर क्लिक करा ओळखपत्र कागदपत्र अपलोड करा

पत्त्यासंबंधी कागदपत्र अपलोड करा तुमची याला संमती असल्याचे सबमिट करा

आधार कार्ड अपडेट स्टेटस ऑनलाइन कसे पाहावे

ओळखपत्र तसेच पत्ता यात बदलासाठी केलेल्या विनंतीनुसार चेंज रिक्वेस्ट क्रमांक यू आर एन तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एसएमएस ने पाठविला जातो हा यु आर एन क्रमांक आणि आधार नंबर यांचे आधारित तुम्ही तुमच्या विनंतीची स्थिती युआयडीएच्या पोर्टलवर चेक अपडेट स्टेटस या सेक्शन मध्ये बघू शकता

See also भारताचा तिरंगा चंद्रावर । चंद्रायन 03 मोहीम यशस्वी

Leave a Comment