अहमदनगर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती | Maharashtra Ahmadnagar District Information

Ahmadnagar District Information : नमस्कार मित्रांनो आज आपण अहमदनगर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती बघणार आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा मजलक अहमद यांना इसवी सन १४९४ मध्ये वसवला व निजामशहाचा राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने हे नाव पडलं ,

अहमदनगर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती | Maharashtra Ahmadnagar District Information
अहमदनगर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती | Ahmadnagar District Information

अहमदनगर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती | Maharashtra Ahmadnagar District Information

जिल्ह्याचे मुख्यालय आहे अहमदनगर असून एकूण क्षेत्रफळ हे 17 हजार 48 चौरस किलोमीटर आहे

अहमदनगर शहरात एकूण तालुके 14 आहे ज्यामध्ये अकोले ,संगमनेर ,कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, पाथर्डी, शेगाव, अहमदनगर, राहुरी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड आणि राहता यांचा समावेश होतो .

नगर जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा आहे तर अहमदनगर च्या पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा आहे तर दक्षिणेस सोलापूर व पुणे हा जिल्हा आहे पश्चिमेस ठाणे व पुणे जिल्हा आहे अशा पद्धतीने अहमदनगरच्या ह्या चारही बाजूने आपण जाणून घेतले की कुठले कुठले जिल्हे आहेत

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या नद्या गोदावरी नदी आहे सीना नदी आहे मुळा प्रवरा भीमा ढोरा आणि गोड या महत्त्वाच्या नद्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्यामध्ये तांदूळ ज्वारी गहू कापूस ऊस मका मोसंबी द्राक्षे इत्यादी पिके प्रामुख्याने घेतली जातात

अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे प्रवरा नदीवर बंधारा म्हणजेच त्याला भंडारदरा धरण असे म्हणतात

मुळा नदीवरील बारागाव नांदूर येथील धरण सुद्धा प्रसिद्ध आहे

जिल्ह्यांमध्ये थंड हवेचे ठिकाण हे म्हणजे भंडारदरा प्रसिद्ध आहे

अहमदनगर जिल्हा बाबत ची माहिती Ahmadnagar District Information

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा होय एकेकाळी निजामाची राजधानी होती

अहमदनगर येथे चांदबिबीचा महाल आहे तो खूप प्रसिद्ध आहे

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ जेव्हा बंदिवासात होते 1942 मध्ये चले जाव आंदोलन चालू होता तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल मौलाना आझाद महत्त्वाचे राष्ट्रीय नेते नगरच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त होते तेव्हा त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता

See also फळांची नावे - fruits name in english and marathi

या जिल्ह्याची बरेच वैशिष्ट आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर म्हणजे कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्हा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांची सीमा लागलेले आहे त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठ प्रसिद्ध आहे आणि चांगदेव महाराजांची समाधी आहे पुणेतांबे या गावाला त्यानंतर अहमदनगर पासून प्रवरा नदीच्या काठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे सुद्धा गाव अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी आहे

नगर जिल्हात प्रवरा नदीकाठी दायमाबाद ठिकाण आहे त्या ठिकाणी प्राचीन व ताम्रपाषाण युगाचे अवशेष सापडतात यासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे शिर्डीचे साईबाबा आणि शनिशिंगणापूरचे हे दोन्ही धार्मिक स्थळ आहे आणि खूप प्रसिद्ध आहे सोबतच अष्टविनायकांपैकी एक विनायक म्हणजे सिद्धिविनायक हे नगर जिल्ह्याच्या सिद्धटेक या ठिकाणी आहे आणि प्रवरा नदीकाठी या जिल्ह्यामध्ये अगस्ति ऋषीचा आश्रम असलेल्या गाव म्हणजे अकोले हे आहे काळवीट साठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र अहमदनगर जिल्ह्यात आहे

दृष्टीक्षेप –

  • क्षेत्र: १७,०४८ चौ.कि.मी.
  • भाषा: मराठी
  • उत्तर अक्षांश: १८.२-१९.९
  • पूर्व रेखांश: ७३.९-७५.५
  • महसुली गावे : १६०२
  • लोकसंख्या: ४५,४३,१५९
  • पुरुष: २३,४२,८२५
  • महिला: २२,००,३३४

सोर्स – https://ahmednagar.nic.in/

अहमदनगर चे जुने नाव काय होते?

अहमदनगरचे जुने नाव भिनार असं होतं

अहमदनगर येथील प्रसिद्ध अन्न म्हणजेच food हे कोणतं

चपाती भाकरी भाजी भात डाळ आमटी

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा

अहमदनगर

श्रीरामपूर येथे … संशोधन केंद्र अहमदनगर जिल्ह्यात आहे

मोसंबी

चांगदेव महाराजांची समाधी कोठे आहे

पुणेतांबे

प्रवरा नदीकाठी या जिल्ह्यामध्ये अगस्ति ऋषीचा आश्रम असलेल्या गाव म्हणजे

अकोले अहमदनगर

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोठे लिहला

अहमदनगर

शिर्डीचे साईबाबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे

अहमदनगर

Leave a Comment