Anganwadi Bharti : अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन 2023 सुरू । सविस्तर माहिती पहा | अंतिम तारीख 30 जून 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन 2023 सुरू झालेली असून मानधन तत्वावर जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वास्तव्यची अट ,वयाची अट ,लहान कुटुंब इत्यादी संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत

शैक्षणिक पात्रता

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

बारावी उत्तीर्ण गुणपत्रक आवश्यक असून गुणपत्रक नसल्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यापेक्षा जास्त शैक्षणिक अहर्ता धारण करणारे उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या गुर् पत्रिकांच्या सत्यप्रती सादर करणे आवश्यक राहणार आहे

Anganwadi Bharti : अंगणवाडी मदतनीस भरती

वास्तव्याची अट । स्थानिक रहिवासी

सदर उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक राहणार आहे ज्या शहरातून किंवा गावातून आपण अर्ज केला आहे तेथील रहिवाशी असणे आवश्यक आहे

वयाची अट

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्ष कमीत कमी व जास्तीत जास्त 35 वर्ष आहे

तसेच विधवा महिलां उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे

वय पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत आवश्यक आहे उमेदवाराची किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक ला गणग्यात येणार आहे

अनुभवाची अट

अनुभवाची कोणती अट नाही परंतु दोन वर्षापेक्षा जास्त संबंधित कामाचा अनुभव असेल तर अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येतील

सेवा समाप्तीसाठी वयाची अट

यांची सेवा वयाच्या 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडी तोपर्यंत सुरू राहील

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी

दिनांक 16-6-2023 ते दिनांक 30-6-2023 सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून

जिल्हया नुसार पद संख्या व नोटिफिकेशन

अ. क्र.जिल्हाएकूण जागाअर्जाचा शेवटचा दिनांकपहा
01लातूर3830 जून pdf
02बुलढाणा0830 जुलै pdf
03अहमदनगर3523 जून pdf
04सातारा5930 जून pdf
05अमरावती11803 जुलैpdf1 pdf2
06कोल्हापूर9103 जुलैpdf1 pdf2 pdf3
07नवी मुंबई3128 जूनpdf
08परभणी4203 जुलैpdf

अधिक माहिती साठी हा विडियो पहा – पहा

See also नांदेड येथे 500 पदासाठी रोजगार मेळावा

Leave a Comment