आरोग्य विभागाची दिनांक 24 व 31 ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या परीक्षेत उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या शुल्काबाबत अपडेट

आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील घटक व घटना पदभरती करिता यापूर्वी दिनांक 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टीसीएस आयओएन या कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे

तसेच जे उमेदवार 24 व 31 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा दिली आहे त्या सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क भरल्या बाबतचा बँक तपशील उपलब्ध करून द्यायचा आहे

त्यानंतर न्यासा कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या माहिती पडताळणी करून संचालक आरोग्य सेवा यांनी पात्र उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबतची कार्यवाही करावी तसेच उमेदवारांना पडताळणीसाठी त्यांची माहिती व बँक तपशील भरण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी आवश्यक ती सुविधा पोर्टल उपलब्ध करून द्यावी

आरोग्य विभागाची दिनांक 24 व 31 ऑक्टोबर रोजी रद्द झालेल्या परीक्षेत उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या शुल्काबाबत अपडेट
See also (Sainik School) सातारा सैनिक स्कूल भरती 2020

Leave a Comment