Cast Validity Update : जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात 26 जुलै पर्यंत विशेष मोहीम

पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम 26 जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे

नुकतेच 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच डिप्लोमा मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी व सरळ द्वितीय वर्ष प्रवेश डिप्लोमा मधून डिग्री मध्ये गेलेले विद्यार्थी यांच्याकरिता ही मोहीम राबविण्यात येत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत व्हॅलिडीटी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र ची अडचण जाऊ नये म्हणून ही मोहीम राबवत आहे विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेतूनच त्यांना जात वैधता प्रमाणपत्र या मोहिमेतून उपलब्ध करून दिले जात आहे

कोणाला लागेल जात वैधता प्रमाणपत्र

12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विज्ञान शाखा

बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी

एम एच टी सीईटी जे इ इ नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी

एमबीए, पीएचडी बीएससी ऍग्री बी फार्म बीएससी नर्सिंग इत्यादी कोर्सेस करिता व्हॅलिडीटी आवश्यक आहे

इंजीनियरिंग डायरेक्ट सेकंड इयर

कास्ट व्हॅलिडीटी करिता लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे

  • विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टीसी
  • विद्यार्थ्याच्या वडीलाचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टीसी
  • संबंधित महाविद्यालयाचे शिफारस पत्र
  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शपथ पत्र

ऑनलाइन अर्ज कोठे भरावा

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असेल त्यांनी बार्टीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करून अर्ज फिलअप करावा अर्ज फिलअप केल्यानंतर अर्जाची प्रत ची प्रिंट घ्यायला विसरू नका

अर्जात त्रुटी आली तर काय करावे

जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आली असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बार्टीमार्फत संदेश दिला जाईल आणि संबंधित त्रुटी त्यामध्ये लिहिलेली राहील संबंधित कागदपत्र वेबसाईटवर अपलोड करावे व तुमची त्रुटी तुम्हाला दूर करता येईल

See also महाराष्ट्र मान्सून पाऊस तारीख अंदाज २०२३ - पंजाबराव डख

Leave a Comment