Chalu Ghadamodi 12 March 2022 / 12/03/2022 च्या चालू-घडामोडी

Chalu Ghadamodi 12 March 2022 / 12/03/2022 च्या चालू-घडामोडी

Chalu Ghadamodi 12 March 2022 / 12/03/2022 च्या चालू-घडामोडी


पंचसूत्रीतून विकासाचा संकल्प, सीएनजी स्वस्त होणार, शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान. करोणामुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने कृषी आरोग्य मनुष्यबळ विकास दळणवळण आणि उद्योग या पंचसुत्री च्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत चार लाख कोटी खर्चून नागरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यासाठी पुढील आर्थिक वर्षात 115000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला.


एसटी कर्मचाऱ्यांवर तुर्थ कारवाई न करण्याचे निर्देश. विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांच्या अन्य मागण्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारणार की नाही, याबाबत 22 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. त्याच वेळी 22 मार्च पर्यंत एकाही कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करू नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भारतातील क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत! भारताचे अतिवेगवान क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत 124 किलोमीटर आतपर्यंत गेल्याचा प्रकार नुकताच घडला. यामुळे आपल्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने भारतीय दूतावासाकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भारताच्या अतिवेगवान क्षेपणास्त्राने 9 मार्च ला संध्याकाळी 6.43 मिनिटांनी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केला होता, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. नियमित देखभाल करताना करताना तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र अपघाताने उडाले आणि पाकिस्तानी हद्दीत कोसळले. ही घटना खेदजनक असून तिची चौकशी करण्यात येत आहे असे भारताने म्हटले आहे.

टाळेबंदीमुळे 36 टक्के जागतिक कर्जबाजारी, ग्रामीण भागात 44 टक्के तर शहरात 29 टक्के नागरिकांचा समावेश. करोना काळात टाळे बंदीमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि वैद्यकीय खर्चाचा बोजा वाढल्याने लाखो नागरिक कर्जाच्या खाईत लोटले गेले. राज्यात ग्रामीण भागात सुमारे 44 टक्के तर शहरी भागात 29 टक्के नागरिक कर्जबाजारी झाले असल्याचे यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

See also मराठी सर्वोत्तम दर्जेदार दैनिक चालू घडामोडी प्रश्न संच व उत्तरे ०८ जून २०२२ | Marathi Daily Current Affairs 08 June 2022

आज पासून चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रकाश झोतात भारत श्रीलंका दुसरी कसोटी. भारताचा आज वेस्ट इंडिज शी सामना. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा.

पेटीएम पेमेंट बँकेला नवीन खाते उघड्यावर निर्बंध. पेटीएम पेमेंट बँकेला पुढील आदेश येईपर्यंत नवीन ग्राहकांची खाते उघडता येणार नाही असे फर्मान रिझर्व बँकेने शुक्रवारी दिले. बँकेला तिच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीचे सर्वसमावेशक परीक्षण करण्यासाठी त्रयस्थ आयटी ऑडिट कंपनी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षण विषयक त्रुटीवरून ती कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35 अ अंतर्गत अधिकाराचा वापर करीत रिझर्व बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड ला तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यास थांबवण्याची निर्देश प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

देबाशिष पांडा नवे इर्डा प्रमुख केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वित्तीय सेवा सचिव म्हणून कारकीर्द राहिलेल्या देवाशीष पांडा यांची भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ईरडा या विमा उद्योगाच्या नियंत्रक असलेल्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने शुक्रवारी नियुक्त केली.

नागपुर एम्स ला अखेर जनुकीय चाचणी यंत्र, अमेरिकेच्या पेथ संस्थेकडून देणगी. जनुकीय चाचणीतून विषाणूचा प्रकार कळावा यासाठी नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान केंद्र सरकारला चार महिन्यापूर्वी जनुकीय चाचणी यंत्र खरेदीची परवानगी मागितली होती परंतु मेक इन इंडिया या निकषामुळे हा प्रकल्प रखडला. परंतु आता अमेरिकेच्या पेथ या संस्थेने एम्स ला देणगीतून हे यंत्र दिले.

प्रत्येक जिल्ह्यात महिला नवजात शिशु रुग्णालय स्थापन होणार. आरोग्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी साडेसात हजार कोटी रुपये मंजूर. पिक कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान. शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा. 41 हजार 55 कोटी रुपये कर्जाचे वाटप. रस्ते विकास यावर पंधरा हजार कोटींची तरतूद.

एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट. अर्थसंकल्पातील पंचसूत्री तून ध्येय गाठण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास. समाजातील सर्व घटकांना दिलासा देणाऱ्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या पंचसूत्री च्या माध्यमातून एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. पंचसूत्री मुडे विकासाला गती येईल असे मत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

See also Marathi Current Affairs - Chalu Ghadamodi - 03 July 2022

Chalu Ghadamodi 12 March 2022 / 12/03/2022 च्या चालू-घडामोडी prashn uttare

नुकतीच “नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी” (NFRA) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – अजय भूषण पांडे

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे?

उत्तर – झुलन गोस्वामी

कोणत्या राज्य सरकारने “सुषमा स्वराज पुरस्कार” जाहीर केला?

उत्तर – हरियाणा राज्य सरकारद्वारे

अलीकडे कोणत्या राज्यात “फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट” स्थापन करण्यात आला?


उत्तर – तमिळनाडूमधील थुथुकुडी

10 ते 15 मार्च दरम्यान “साहित्योत्सव” कोणाच्या वतीने आयोजित केला जात आहे?


उत्तर – साहित्य अकादमी द्वारे

Leave a Comment