Chalu Ghadamodi – Current Affairs Marathi – 16 March 2022

Chalu Ghadamodi – Current Affairs Marathi – 16 March 2022

Chalu Ghadamodi - Current Affairs Marathi - 16 March 2022

16/03/2022 च्या चालू घडामोडी

हिजाबबंदी वैधच! कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा. इस्लाम मध्ये हिजाब परिधान करणे ही अत्यावशक धार्मिक प्रथा नाही. असा निर्वाळा देत कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांमधील हिजाब बंदी ही वैध असल्याचा निकाल मंगळवारी दिला उच्च न्यायालयाने हिजाब बंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या.

विधानसभाध्यक्ष निवडणुकीस राज्यपालांनी परवानगी नाकारली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणुकीसाठी तारीख निश्चित करता येत नाही अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी घेतली आहे. तसे पत्र राज्यपालांनी विधिमंडळ सचिवालय आला पाठवले असून ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे.

बोगस मंजूर प्रकरणी प्रवीण दरेकर आमदार गुन्हा. मजूर असल्याचे भासवून मुंबई बँक ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरेकर हे श्रीमंत मजूर असल्याचे वृत्त लोकसत्ताने सर्वप्रथम दिले होते. त्यानंतरच दरेकर यांच्यावरील कारवाईला वेग आला.

संशोधन विकास कक्षाची उच्च शिक्षण संस्थान मध्ये स्थापना. आत्मनिर्भर भारतासाठी देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन नवसंकल्पना आणि तंत्रज्ञान विकासासाठी संशोधन आणि विकास कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. गेल्या काही वर्षात सातत्याने संशोधना ला चालना देण्याची गुणवत्तापूर्ण संशोधनाची गरज व्यक्त केली जात आहे त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनात संदर्भात वातावरण निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून यूजीसीने संशोधन आणि विकास कक्षाची स्थापना करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार केले आहेत. या मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या स्तरावर या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याची सूचना यूजीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार. भरारी पथकांची दुर्लक्ष, अभ्यासू विद्यार्थ्यांना फटका. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात गैरप्रकारांना उत आला आहे. करोणा नंतर मुलांना पुन्हा पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा देता यावी म्हणून शासनाने पालक शाळांमध्येच परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला मात्र परीक्षेच्या वेळेपूर्वी पेपर फुटणे व्हाट्सअप वर उत्तरे पाठविणे सामूहिक कापीला मुभा देणे असे प्रकार सर्रासपणे राज्यभरातील परीक्षा केंद्रावर सुरू असल्याचे परीक्षेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे
विशेष म्हणजे परीक्षेतील गैरप्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या देखरेखीतच हा प्रकार सुरू असल्याने प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.

काश्मीर फाइल्सच्या बदनामीचा कट नरेंद्र मोदी. भाजपाची भाजप पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये कर मुक्त झालेल्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या वादावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाचे बदनामी करत आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. काश्मीर खोऱ्यातून 1990मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायन आवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर राहिलेला आहे या चित्रपटा वर काँग्रेसने तसेच तसेच काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत या विरोधाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले. हा चित्रपट काश्मिरी पंडित कित्येक वर्ष जाणीवपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो मात्र या चित्रपटाची बदनामी केली जात आहे एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा. असे मोदी आणि भाजपच्या खासदारांन समोर मांडले.

आज पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे करोना लसीकरण. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यभरात बुधवारपासून 12 ते 14 वयोगटातील बालकांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे राज्यात या वयोगटातील सुमारे 65 लाख बालके या लसीकरणासाठी पात्र असून या बालकांना कोब्याव्हॉक्स ही लस देण्यात येणार आह

महामहोपध्याय पा.वा.काने यांच्या नावे विशेष टपाल तिकीट. कायदे पंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न पा.वा. काने यांच्या नावे विशेष टपाल तिकीट काढले जाणार असून केंद्रीय टपाल व तार विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने मान्यता दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून महा महोपध्याय पांडुरंग वामन माने यांचे नावे विशेष टपाल तिकीट काढण्याची विनंती केली आहे. तसेच पवार यांनी पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पा.बा. काने यांच्या नावे विशेष टपाल तिकीट काढण्यास मान्यता दिली आहे.

टीईटी गैरव्यवहार प्रकरण सनदी अधिकारी सुशील खोडवेकर तुकाराम सुपे यांच्यासह पंधरा आरोपींवर दोषारोपपत्र. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी गैरव्यवहार प्रकरणात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक सनदी अधिकारी सुशील खोडवेकर व शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह 15 आरोपींवर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले. सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोप पत्र 3995 पाणी आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने आणि कागदपत्रांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याचे सायबर पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

युक्रेन मधून परतण्यास अनेक विद्यार्थ्यांचा नकार परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची माहिती.

युद्धग्रस्त युक्रेन मधून आतापर्यंत बावीस हजार भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यात आले आहे तिथे दैनंदिन संकटांचा सामना करावा लागत असून देखील कित्येक विद्यार्थ्यांनी परत येण्यास नकार दिला असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

युरोपियन स्पर्धेसाठी रशिया वरील बंदी उठवली रशियन फुटबॉल संघावर युरोपियन स्पर्धा साठी घालण्यात आलेली बंदी मंगळवारी रेडा लवादा कडून ठेवण्यात आली आहे. रशियाच्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबत या आठवड्यात अखेरीस वेगळी सुनावणी होईल.

आयपीएल आणखी रोमांचक होणार. यंदा डी आर एस सुपर वर सारख्या नियमांमध्ये बदल.

टाटा मोटर्सचा ई व्हीं वर भर. पंधरा हजार कोटींचे गुंतवणूक नियोजन. टाटा मोटर्सने येत्या पाच वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने विद्युत वाहनांच्या ई- वाहने निर्मितीसाठी पंधरा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे असे टाटा मोटर्स चे प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष शैलेंद्र चंद्रा यांनी मंगळवारी सांगितले.

Chalu Ghadamodi Daily Prashn Uttre

नुकताच “जागतिक ग्राहक हक्क दिन” कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १५ मार्च

नुकताच “आंतरराष्ट्रीय गणित दिवस” ​​कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 14 मार्च

नुकतेच “योग महोत्सव 2022” चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
उत्तर – सर्बानंद सोनोवाल

नुकतीच FATF चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: टी राजा कुमार

हंगेरीच्या नुकत्याच पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा कोण झाल्या आहेत?
उत्तर – कॅटलिन नोव्हाक

See also Marathi Current Affairs | Chalu Ghgadamodi 2022 | 1 July 2022 |

Leave a Comment