Daily Current Affairs Marathi Prashn Uttre – मराठी चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२२

Daily Current Affairs Marathi Prashn Uttre – मराठी चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२२ प्रश्न उत्तरे

Daily Current Affairs Marathi Prashn Uttre - मराठी चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२२ प्रश्न उत्तरे

28/02/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी.

रशियाची आर्थिक नाकेबंदी, स्विफ्ट प्रणालीतून बँका हद्दपार अमेरिकेसह मित्र राष्ट्राचा निर्णय. युक्रेन वर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना स्विफ्ट या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकांवर निर्बंध लादणे , या कठोर निर्बंध मागे रशियाची अर्थ श्रमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थ पुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा हेतू आहे.

दिशा सालियन प्रकरणात राणे पिता -पुत्रां विरोधात गुन्हा. मूलीचे नाहक बदनामी होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप.

तिहेरी तलाक च्या प्रकरणात 80 टक्के घट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महिला सक्षमीकरणाची ग्वाही, तिहेरी तलाक ही दृष्ट सामाजिक रूढी असल्याचे मत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले की देशात तिहेरी तलाक विरोधात सप्टेंबर 2019 मध्ये कायदा झाल्यापासून या प्रकरणात मोठी घट झाली आहे.

वर्चस्व मालिका कायम. श्रेयस अय्यर च्या सलग तिसऱ्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारत आणि तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाहुण्या श्रीलंकेवर सहा गडी आणि अकरा चेंडू राखून मात केली, या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 3.0 ने मालिका जिंकली.

सारस चे सुधारित विमान 2024 मध्ये उड्डाण करणार, एन ए एल च्या संचालकाची माहिती. कानपूरमध्ये 2026 पासून बनणार पहिले भारतीय नागरी विमान.

युक्रेन मधून भारतीयांना आणण्यासाठी प्रति उडान एक कोटींवर रुपये खर्च, विमानात दोन चालक दल एअर इंडिया आकारणार ऑपरेशनल शुल्क. केंद्र सरकार उचलणार संपूर्ण खर्च.

कोरोनाची तिसरी लाट शमली, परंतु कोरोना नव्हे. मास्क मुक्ती बाबत विचारपूर्वक निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे.

महाराष्ट्रातील 21 हजार 780 ग्रामपंचायत ब्रॉडबँड सेवेने सज्ज, भारतनेट 11014 गावात वाय फाय हॉटस्पॉट लावण्यात आलेले आहे.

Daily Current Affairs Marathi Prashn Uttre – मराठी चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२२ प्रश्न उत्तरे

अलीकडेच मॉस्को वुशू स्टार्स चॅम्पियनशिपमध्ये सादिया तारिकने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर – सुवर्णपदक

अलीकडे कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 93 मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली?
उत्तर – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर: ४८ वा

२०२१ मध्ये भारत ४० व्या क्रमांकावर होता तर 2020 मध्ये भारत 100 पैकी 38.46 गुणांसह 40 व्या क्रमांकावर होता, तर 2019 मध्ये भारत 36 व्या क्रमांकावर होता.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये भारतात एफडीआय इक्विटी प्रवाह 16 टक्क्यांनी कमी झाला आहे?
उत्तर – $43 अब्ज

भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यात भारतीय रेल्वेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे?
उत्तर – मध्य प्रदेशातील बिना येथे

श्री नारायण राणे यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात सिंधुदुर्गमध्ये एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर – महाराष्ट्र

See also चालू घडामोडी | Chalu Ghadamodi 2022 | 13 आणि 14 ऑगस्ट 2022

Leave a Comment