dnyaneshwari in marathi – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ pdf – dnyaneshwari pdf –

dnyaneshwari in marathi : महान संताची भूमी महाराष्ट्र ओळखला जातो . महाराष्ट्रात अनेक साधू संत होऊन गेलेत . जसे की संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास , संत तुकडीजी महाराज , संत गाडगे बाबा इत्यादी अनेक साधू संत महाराष्ट्रात होऊन गेलेत. आजच्या या लेखात आपण महान संत ज्ञानेश्वर मराठी अर्थ pdf पाहणार आहोत

dnyaneshwari in marathi – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ pdf – dnyaneshwari pdf –

संत ज्ञानेश्वर महाराज माहिती —

  • संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी 1275 साली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला.
  • ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.
  • विठ्ठल पंत हे एक संन्यासी होते. विवाहात असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. परंतु तेथील गुरूंना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी विठ्ठलपंतांना वापस गृहस्थाश्रमात पाठवले.
  • गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. त्यांचे नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई असे होते.

विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून परत संसारात प्रवेश केल्याने त्या काळी संन्यासाची मुले म्हणून समाज यांच्या कुटुंबाची हेटाळणी करीत असे. समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. यामुळे त्या सर्वांना खूप कष्ट सोसावे लागले. समाजातून बहिष्कृत झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी झोपडी सुद्धा नव्हती. लोकांद्वारे होत असलेला त्रास सहन करत करत शेवटी विठ्ठलपंत यांनी आपली पत्नी रुक्मिणीबाई सोबत आत्महत्या करून प्रायश्चित केले.

आई वडिलांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्ष ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडाना समजाद्वारे फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न पाणी या सारख्या गोष्टी देण्यासही नकार देण्यात आला. या नंतर ते भावंड पैठण ला गेले. 15 वर्षाच्या कमी वयात त्यांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वताला तल्लीन करून दिले. कमी वयात ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली व ते एक साक्षात्कारी योगी झाले .

See also नागपंचमी माहिती पूजा विधी सामग्री शुभ मुहूर्त महत्व आरती संपूर्ण माहिती मराठी मध्ये

ज्ञानेश्वरांचे कार्य ग्रंथ साहित्य-

  • ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1290 साली “भावार्थदीपिका” नावाचा ग्रंथ लिहिला याला “ज्ञानेश्वरी” देखील म्हटले जाते.
  • हा ग्रंथ भगवदगीतेचा मराठी अनुवाद होता.
  • या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत सर्वांना समजेल अश्या पद्धतीने दिले.
  • ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ ‘अमृतानुभव’ होय.
  • विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म एक्याचा ग्रंथ आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव महाराज

चांगदेव महाराज हे अनेक सिद्धी प्राप्त केलेले योगी होते. त्यांनी जवळपास 42 वेळा मृत्यूला पण हरवले होते. या मुळे म्हटले जाते की ते 1400 वर्ष आयुष्य जगले. लोकांच्या तोंडून त्यांना संत ज्ञानेश्वरांची ख्याती ऐकायला आली. इतक्या कमी वयाच्या मुलाला समाजाकडून एवढी ख्याती कशी मिळत आहे असा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यांना ज्ञानेश्वरांनप्रती मत्सर वाटायला लागला. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचे ठरविले. परंतु जेव्हा त्यांनी पत्रलेखनाला सुरुवात केली तेव्हा पत्राची सुरुवात कश्याने करावी हेच त्यांना सुचत नव्हते. ज्ञानेश्वराला चिरंजीव म्हणावे की तीर्थरूप, कारण जर चिरंजीव म्हणावे तर विधनात्मक ज्ञान त्याच्या तोडून निघता आहे व तीर्थरूप म्हणावे तर तो वयाने खूप लहान आहे

शेवटी चांगदेवांनी कोरे पत्रच ज्ञानेश्वरांना पाठून दिले. ते पत्र संत ज्ञानेश्वरांच्या बहीण मुक्ताबाई च्या हातात आले. पत्राला पाहून मुक्ताबाई म्हणाल्या 1400 वर्ष जगूनही चांगदेव अजून पण कोराच आहे. चांगदेवांच्या या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्या लिहून पाठवल्या. हाच तो चांगदेव पासष्टी ग्रंथ होय.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी –

फक्त 21 वर्षाच्या कमी वयात इसवी सन 1296 मध्ये महान संत ज्ञानेश्वर यांनी सांसारिक मोहमाया त्यागून समाधी धारण केली.

त्यांची समाधी ही आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्थित आहे.

ज्ञानेश्वरांच्या समाधी च्या अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या तीन भावंडांनी सुद्धा आपली इहलोकीची यात्रा संपवली.

12

( DOWNLOAD PDF ) संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठी अर्थ | Dnyaneshwari IN PDF Download Marathi

See also Sant Tukaram Information In Marathi - संत तुकाराम माहिती मराठी

ज्ञानेश्वरी मराठी अर्थ pdf – dnyaneshwari pdf – dnyaneshwari in marathi pdf

Leave a Comment