नॉन क्रिमीलेअर व ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना मिळणार तीन महिन्यांची मुदत

Photo 1687962836235

मित्रांनो अकरावीच्या प्रवेश साठी विविध कागदपत्रांची आवश्यकता विद्यार्थ्यांना लागत आहे परंतु सर्वरच्या तांत्रिक अडचणी आणि शासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र काही मिळत नाही आहे

कागदपत्र मिळण्यास बराच उशीर होत आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर व ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याची निर्देश राज्याचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाच्या संचालकांना दिले आहेत

सन 2023 24 च्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले मिळण्यास अडचण निर्माण झाली असल्यामुळे ज्यांना उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे त्या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेऊन आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा असे म्हटले आहे

त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश साठी मार्ग सोयीस्कर झाला असून नॉन क्रिमिलियर आणि ई डब्ल्यू एस बाबत विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना सरकारने दिलासा दिला आहे तसेच अकरावी सोबत आयटीआय ला सुद्धा हाच निर्णय लागू करण्याची मागणी जोर धरत आहे

See also 40,000 विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार

Leave a Comment