आयुष्यमान भारत योजना – आता राज्यात सर्वांना 5 लाखा पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार

आयुष्यमान भारत योजना : राज्यामध्ये राईट टू एज्युकेशन च्या धरतीवर राईट टू हेल्थ हे धोरण राबवले जाणार असल्याची घोषणा करीत महिनाभरात राज्यभर सर्व उपचार शंभर टक्के मोफत दिले जाणार असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे

IMG 20230629 094452 941

शासकीय रुग्णालयांमध्ये केस पेपर काढणे तपासणे औषध उपचार यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते अनावश्यक खर्चाला कात्री लावून त्या निधीचा वापर रुग्णसेवेसाठी करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले

रुग्णालयामधील केस पेपर तपासणी औषधोपचार यातून आरोग्य विभागाकडे साधारणपणे 71 कोटी रुपये महसूल जमा होतो मात्र या प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर 100 कोटी रुपये खर्च होतो म्हणून मूळ प्रक्रिया बंद केल्यास 30 कोटी रुपयांची बचत होणार व तेथील कर्मचारी अत्यावश्यक ठिकाणी सुद्धा नेमता येणार

आयुष्यमान भारत योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपये

IMG 20230629 094344 981

राज्यात उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालय पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपर विजन चार्ज म्हणून सुमारे 650 कोटी रुपये दिले जातात या कामाची जबाबदारी आरोग्य विभागाकडून उचलली जाणार आहे त्यामुळे साडेसहाशे कोटी रुपयांची बचत होणार

स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी इंटेन्सिव्ह वाढवले जाणार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे

दोन वर्षांपूर्वी गट क आणि गट ड श्रेणीतील पदांची परीक्षा रद्द करण्यात आली होती विद्यार्थ्यांना याबाबत 20 महिन्यापासून प्रतीक्षा आहे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे त्यासाठी टीसीएस कंपनी सोबत करार सुद्धा झाला असून फी भरलेल्या विद्यार्थ्यांना फी परत भरावी लागणार नाही

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची एकत्रीकरण करून नागरिकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला

तब्बल दोन कोटी जन आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार व रुग्णालयांची संख्या देखील वाढवली जाणार

सध्या मूत्रपिंड शास्त्रीय क्रियेसाठी अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे

प्रधानमंत्री जन आरोग्य योजने एकूण उपचार संकेत 147 वाढ होऊन आता 1356 इतकी करणार

महात्मा फुले योजनेमधील 996 उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील 1209 उपचार यातील मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येणार आहे तर नव्याने 328 नवीन उपचारांचा समावेश देखील करण्यात येणार आहे

महात्मा फुले जन आरोग्य योजना याआधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भारतात लागू

महाराष्ट्रातील 140 व कर्नाटक सीमेलगतचे चार जिल्ह्यात दहा अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय याशिवाय आणखी दोनशे रुग्णालय देखील अंगीकृत करण्याचा निर्णय घेण्यात येणार

स्व बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येणार

यातील 30 हजार रुपयांच्या उपचाराची मर्यादा वाढवून प्रति रुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये करण्यात येणार

Leave a Comment