Ganpati Stotra In Marathi – गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra In Marathi : श्री गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्न हर्ता , मंगल करणारा , संकट दूर करणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेश स्तोत्र मराठी मध्ये आम्ही आपणास येथे उपलब्ध करून देत आहोत . अधिक अपडेट साठी – https://marathijobs.in

भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात-

सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।।

Ganpati Stotra In Marathi
Ganpati Stotra In Marathi

गणपती जन्म –

माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती , स्वप्न , सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे

गणेश चतुर्थी –

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असे म्हणतात. एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

श्री गणपती स्तोत्र संस्कृत

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।१।।

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

See also रोजगार मेळावा // Maharashtra Jobs Fair 3000+ Vacancy

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

गणपती स्तोत्र मराठी | Ganpati stotra in marathi

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

।। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण।।

Ganpati Stotra In Marathi

गणपती स्तोत्र (संकटनाशन स्तोत्र) – Sankat Nashan Ganpati Stotra

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्

भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्

तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:

न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्

संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय:॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम॥

महाराष्ट्रातील गणेशोत्सव मोठा उत्सव असतो . प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासुन सुरू होतो. हा उत्सव दहा दिवस चालतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात. पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सव्याच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहेत. पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास इ.स. १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले.

See also महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 95 जागांसाठी भरती

अष्टविनायक

  • १ मोरगांव -मोरेश्र्वर
  • २ थेऊर – श्री चिंतामणी
  • ३ सिद्धटेक -श्री सिद्धिविनायक
  • ४ रांजणगाव -महाग णपती
  • ५ ओझर – विघ्नेश्र्वर
  • ६ लेण्याद्री – श्री गिरिजात्मज
  • ७ महड -वरदविनायक
  • ८ पाली – श्री बल्लाळेश्वर

गणपती स्तोत्र मराठी pdf | Ganpati stotra in marathi pdf-

Ganpati Stotra In Marathi

FAQ Ganpati Stotra In Marathi

गणपतीचे वाहन कोणते ?

उंदीर हे गणपतीचे वाहन आहे

गणपती स्तोत्र मराठी कोठे मिळेल

marathijobs.in या website वर जाऊन भक्ती मध्ये जाऊन पहा शकता व pdf download करू शकता

गणपती स्तोत्र कोनो लिहले ?

गणपती स्तोत्र नारद पुराणात लिहले आहे

गणपती स्तोत्र का वाचावे ?

गणपती स्तोत्र चे नियमित वाचन व मनन केल्यास श्री गणेश ची असीम कृपा लाभते . जीवनातील अडचणी दूर होतात

2 thoughts on “Ganpati Stotra In Marathi – गणपती स्तोत्र मराठी”

Leave a Comment