गौतम बुद्ध यांची माहिती | Gautam Buddha Information In Marathi

गौतम बुद्ध यांची माहिती | Gautam Buddha Information In Marathi : गौतम बुद्ध हे इक्ष्वाकु क्षत्रिय शाक्य कुळ चे राजा शुद्धोधन यांचे पुत्र जन्म 563 ईसा पूर्व मध्ये लुंबिनी च्या कपिल वास्तु म्हणजेच नेपाळ मध्ये झाला होता त्यांचे नाव सिद्धार्थ महाराज असे होते व त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते सिद्धार्थ महाराज यांच्या जन्मानंतर सात दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ महाराणीच्या छोट्या बहिणीने म्हणजे महाप्रजापती गौतमी यांनी केला.

बौद्ध ग्रंथांनुसार गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून १२ वर्ष पूर्वी एक ऋषि ने भविष्य केले होते कि त्याचा मुलगा हा एक सार्वभौमिक सम्राट किवा महान योगी होईल . 35 वर्ष चे असतानी त्यांना ज्ञान प्राप्त झाले.

गौतम बुद्ध यांची माहिती | Gautam Buddha Information In Marathi

16 वर्षाचे असतांना त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या मुलीशी झाला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे असे होते . सिद्धार्थाच्या वडिलांची इच्छा होती की तो एक महान राजा व्हावा.परंतु संसारीक जीवनात आल्यानंतर त्यांना लोकांचे दुःख बघवत नव्हते.

त्यात त्यांनी बऱ्याच अशा घटना घडतानी बघितल्या की ज्यामुळे त्यांना दुःख का होते, त्यामागचे सत्य काय, त्या पासून कशी सुटका करावी व इतर बऱ्याच प्रश्नांच्या शोधात त्यांनी संसार त्यागून ते सत्याचा शोधात निघून गेले

सत्य शोधत असताना त्यांनी बरीच भ्रमंती केली व गया नावाच्या ठिकाणी ते पोहोचले व तिथे असलेल्या बोधीवृक्ष नावाच्या झाडाखाली ते ध्यान करण्यास बसले आणि तिथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली .त्यानंतर त्यांनी लोकांना अनुग्रहित केले

बुद्धांचे चार सिद्धांत – आर्य सत्याचा सिद्धांत

Gautam Buddha
भगवान बुद्ध
  1. माणूस ( प्राणी) हा आपल्या संपूर्ण जन्माच्या काळात दुःखाच्या अवतीभवती (साखळीत) राहतो. हे दुःख म्हणजेच “महान सत्य” आहे.
  2. जगातल्या वस्तूंची तळमळ ( लालसा ) हेच समाजाचे खरे सत्य आहे. हे दुःख उदात्त सत्य आहे .

(लालसा), तृष्णाने मरणारा मनुष्य आपल्या प्रेरणेने पुन्हा जन्म घेतो याच समुदायाला आर्यसत्य म्हणतात .

  1. लालसा ( तृष्णा ) चा तोल थांबविणे हे एक उदात्त सत्य आहे. लालसा नसल्यामुळे जगातील गोष्टींमुळे दुःख होत नाही किंवा माणसाचा मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही हे एक दुःख निवारण चे सत्य आहे.
  2. विणलेल्या दिव्याप्रमाणे माणूस हा मोक्ष प्राप्त करतो आणि या समाप्तीच्या जाणाऱ्या मार्गालाच आर्य सत्य म्हणतात. या मार्गात आठ दृष्ट्या आहेत .
See also Shiv Stuti in Marathi - शिव स्तुती मराठी

योग्य दृष्टी, योग्य इच्छा, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य उदरनिर्वाह, योग्य व्यायाम, योग्य स्मरणशक्ती आणि योग्य समाधी. हा आर्य मार्ग प्राप्त केल्यानंतर तो मनुष्य मुक्त होतो

बुद्धांना ज्ञान प्राप्ती –

गौतम बुद्ध ज्या सत्याच्या शोधात निघाले होते ते सत्य त्यांना मिळत नव्हते .त्यांनी खूप भटकंती केली साधून कडून ,गुरूंकडून ज्ञान घेतले तरी त्यांना जे सत्य आहे ते मिळत नव्हते .

त्यांनी खुप कठिन तपस्या केली, अन्नपाणी वर्ज केले. त्यांच्याकडे बघून महापुरुषांचे सारखे काहीच लक्षणे दिसत नव्हती .आणि एक दिवस ते अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडले. मग त्यांनी विचार केला की शरीर सुकवून मला काय मिळाले म्हणून त्यांनी पुन्हा भिक्षा मागून अन्न खाण्यास सुरुवात केली.

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध बोधीवृक्षाखाली बसले होते. तिथेच जवळ एक गाव होते त्या गावातील सुजाता नावाच्या एका महिलेने त्यांच्यासाठी खीर आणली .ती खीर खाऊन बुद्धाच्या शरीरात ताकद आली.

त्यानंतर बुद्धांनी प्रण केला की जोवर मला ज्ञान प्राप्ती होत नाही तोवर मी काही तपस्या यातून उठणार नाही आणि ते समाधीत बसले.

त्यानंतर त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर त्या सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले ( बुद्ध ) या शब्दाचा अर्थ ज्ञान प्राप्त होणे म्हणजे बोध असणे असा आहे

Leave a Comment