गोंदिया जिल्हा माहिती – Gondia District Information

गोंदिया जिल्हा माहिती - Gondia District Information
गोंदिया जिल्हा माहिती – Gondia District Information
  • 1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हयाची स्थापना झाली.
  • गोंदिया जिल्‍हा हा भंडारा जिल्‍हयाचे विभाजन करुन निर्माण करण्‍यात आला
  • धान येथील मुख्‍य उत्‍पन्‍न आहे.
  • गहू, तुर, चना, हळद, जवस सुध्‍दा येथे पिकविला जातो.
  • येथील लोकांचा मुख्‍य व्‍यवसाय शेती आहे.
  • गोंदिया प्राचीन काळी गोंड राज्याच्या अधिपत्याखाली होता.
  • त्याकाळी असलेल्या दाट वनात गोंड समाज राहायचा.
  • या गोंड समाजाचा त्याकाळी मुख्य व्यवसाय हा जंगलातील गोंद(डिंक) आणि लाख जंगलातून गोळा करुन गावात आणून विकणे हा असायचा.
  • त्या गोंदवरुन गोंदिया हे नाव पडले असावे
  • जिल्‍हयात मोठया उद्योगांमध्‍ये अदानी समूहाचा अदानी पावर लिमीटेड तिरोडा येथे सुरु झाला आहे.
  • छोटया उ्द्योगांमध्‍ये ब-याच संख्‍येने राईस मिल आहेत.
  • धान येथील मुख्‍य कृषी उत्‍पादन असल्‍यामुळे गोंदिया जिल्‍हा धानाचा जिल्‍हा म्‍हणून प्रसिष्‍द आहे.
  • जिल्‍हयात गोदिया, तिरोडा आणि देवरी असे 3 उपविभाग आहेत
  • गोंदिया आणि तिरोडा येथे नगर परिषद असून
  • गोरेगांव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगांव, देवरी येथे नगर पंचायती आहे

दृष्टीक्षेपात गोंदिया जिल्हा

  • क्षेत्र:5234 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या:13,22,507
  • नगर परीषद:3
  • उपविभाग:4
  • तहसील:8
  • नगर पंचायत:5

गोंदिया जिल्ह्यातील तहसील

  • गोंदिया
  • तिरोडा
  • गोरेगाव
  • देवरी
  • आमगाव
  • सालेकसा
  • अर्जुनी मोरगाव
  • सडक अर्जुनी

गोंदिया जिल्ह्यातील लोकसंख्या

एकूण लोकसंख्या13,22,507
एकूण पुरुषांची लोकसंख्या6,62,656
एकूण स्त्री लोकसंख्या6,59,964
लिंग गुणोत्तर999
शहरी लोकसंख्या2,25,700
ग्रामीण जनसंख्या10,96,631
शहरी लोकसंख्येची टक्केवारी17%
लोकसंख्या घनता253 / Sq.Km.
साक्षरतेचे प्रमाण84.95%
साक्षरतेचे प्रमाण पुरुष83.65%
साक्षरतेचे प्रमाण स्त्री69.55%

गोंदिया जिल्हा भूगोल आणि स्थळ

  • गोंदिया जिल्ह्याचे अक्षांश 20.39 ते 21.38 उत्तर आणि रेखांश 79.27 ते 80.42 पूर्वेकडे आहे.
  • या जिल्ह्याचे उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा
  • असुन पुर्वे दिशेला छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव जिल्हा आहे.
  • दक्षिण बाजुस महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा
  • आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
  • जिल्हा मुख्यालय हे मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गावरील गोंदिया तालुका येथे आहे.
  • गोदिया जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 5641 चौरस किलोमीटर इतके आहे.
  • जिल्हयातील 1 लाख 80 हजार 300 हेक्टर जमीन जंगलाने व्यापलेली आहे.
  • सन 2011 च्या जनगणनेनूसार जिल्हयाची लोकसंख्या 13 लाख 22 हजार 507 आहे.
  • अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 75 हजार 961 इतकी (13.30टक्के),
  • अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 लाख 14 हजार 253 इतकी (16.20 टक्के) आहे.
  • शहरी लोकसंख्या 2 लाख 25 हजार 930 आणि ग्रामीण लोकसंख्या 10 लाख 96 हजार 577 इतकी आहे
  • जिल्‍हयात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाँव असे 4 विधानसभा निर्वाचन आहेत.
See also [1000+] समानार्थी शब्द मराठी - Samanarthi shabd marathi [With PDF]

गोंदिया जिल्ह्यातील महत्वपूर्ण ठिकाण:

नवेगाव बांध : राष्ट्रीय उद्यान. गोंदियाच्या दक्षिणेस, अर्जुनी मोरगाव तालुक्यात 65 कि.मी. अंतरावर आहे.

नागझिरा : राष्ट्रीय अभयारण्य. गोंदियाच्या दक्षिणेस, सडक अर्जुनी तालुक्यात 30 कि.मी. अंतरावर आहे.

बिर्सी विमानतळ : गोंदियाच्या उत्तरेस 12 कि.मी. अंतरावर आहे.

अदानी वीज प्रकल्प : तिरोडा तालुक्यात 30 कि.मी. अंतरावर आहे.

  • मानव विकास निर्देशांकात राज्यात गोंदिया जिल्हा 21 व्या क्रमांकावर आहे.
  • मुंबई-कलकत्ता हा रेल्वेमार्ग तर मुंबई-कलकत्ता हा 6 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयातून जातो.
  • जंगलातील तेंदूपत्ता आणि बांबू ही वनसंपदा जिल्हयातील ग्रामीणांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
  • ग्रॅनाईट, लोह व कॉर्थ ही खनीजे जिल्हयात उपलब्ध आहे.
  • वैनगंगा ही सर्वात मोठी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्हयातून वाहते.
  • याशिवाय गाढवी, बाघ, चुलबंद ह्या नद्या सुध्दा जिल्हयातून वाहतात.
  • हाजराफॉल धबधबा,
  • नवेगावबांध जलाशय,
  • बोदलकसा, पांगडी, चुलबंद,
  • इटियाडोह, शिरपूर , कालीसराड,
  • पुजारीटोला, चोरखमारा
  • पूजारीटोला, कालीसरार, इटियाडोह, शिरपूर सिंचन प्रकल्प

Leave a Comment