Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी | हरतालिका स्थापना

Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी : आज च्या लेखात आपण हरतालिका पुजा कशी करावी हे पाहणार आहे . हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.

Hartalika Puja In Marathi - हरतालिका पूजा कशी करावी
Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी

Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी

हरतालिका व्रत कथा-

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे

हरतालिके चे महत्व –

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी श्रावणातल्या शुध्द तृतीयेच्या दिवशी सुवर्णगौरी… श्रावण मासातच कृष्ण तृतिया दिनाला कज्जली गौरी व भाद्रपद मासात शुध्द तुतियेच्या दिवशी हरितालिका व्रत करावे. म्हणजे सवाष्ण स्त्रिला तीन वेळेस गौरी पुजण्यास शास्त्राने सुचविले आहे.भगवान शिवपार्वती हे त्रिलोकाचे माता पिता म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या मिलनातुन विश्वाची निर्मीती झाली आहे असे आपण मानतो म्हणुन स्त्रीतत्व व पुरूषतत्वाचे पुजन प्रतिकात्मक रूपान व्हावे म्हणुन या दिवशी शिवपार्वतीची पुजा करण्यात येते.

हरतालिका चे नियम –

 1. हरतालिकेचा उपवास निर्जला केला जातो, म्हणजेच पुढच्या सूर्योदयापर्यंत दिवसभर आणि रात्रभर पाणी पिले जात नाही.
 2. हरतालिका व्रत अविवाहित मुली, विवाहित महिला करतात.विधवा स्त्रिया देखील करू शकतात.
 3. हरतालिका व्रताचा नियम नुसार एकदा धरल्यावर त्याचा त्याग करता येत नाही.
 4. हे दरवर्षी पूर्ण नियमांनुसार विधिवत केले जाते.
See also NHM जळगाव मध्ये 542 पदांची भरती – NHM ZP JALGAON VACANCY

हरतालिका पुजेचा विधी – Hartalika Puja Vidhi

Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी

हरतालिका ची पुजा ची काय विधी आहे हे जाणून घेऊ या –

 • हरतालिकेच्या दिवशी एका चौरंगावर भगवान शंकराची वाळुची पिंड तयार करावी.
 • यथासांग पुजा करून सगळया गोष्टी १६ या प्रमाणात शिवाला वाहिल्या जातात.
 • या दिवसांमधे पाऊस भरपुर पडत असल्याने सगळीकडेच हिरवळ असते आणि अनेक वनस्पती उगवलेल्या असतात. दुर्वा, आघाडा, केना अश्या वनस्पती शिवपिंडीला वाहतात.
 • १०८ बेल शिवाची नामावली घेत वाहाण्याची प्रथा आहे. देवी पार्वतीला सौभाग्यलेणं वाहिलं जातं. पंचोपचार पुजा झाल्यानंतर नैवेद्य आरती आणि हरतालिका कथा वाचावी .
 • तिन्ही सांजेला जवळपासच्या सवाष्णींना बोलावुन हळदीकुंकवाचा घेऊ शकता
 • दुसऱ्या दिवशी दहिभाताचा नैवेद्य दाखवुन विसर्जन करण्यात येतं व वाळुने बनविलेली शिवपिंड वाहत्या पाण्यात विसर्जीत केली जाते.

हरतालिका पूजेला लागणारी सामग्री-

 • फुलं,
 • केळीचे पान,
 • सर्व प्रकारची फळे,
 • बेल पत्र,
 • शमी पत्र,
 • आंब्याची पानं,
 • दातुराची फुले,
 • एकवान फूल,
 • तुळशी,
 • वस्त्र,
 • माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, मेण, काजळ, बिंदी, कुंकु, सिंदूर, कंगवा, माहूर, मेहंदी इत्यादी
 • हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, तूप, तेल, दिवा, कापूर, अबीर, चंदन, कलश.
 • पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध. इत्यादि सामग्री लागते

हे पण वाचा –

हरतालिका pradyamdhye गौर कशी टाकायची यांची पद्धत गौर टाकायची पद्धत

हरितालिका गौर पुजा स्थापना।हरतालिका पूजा कशी करावी संपूर्ण माहिती

हरतालिका पुजा कशी करावी?

हरतालिकेच्या दिवशी एका चौरंगावर भगवान शंकराची वाळुची पिंड तयार करावी.
यथासांग पुजा करून सगळया गोष्टी १६ या प्रमाणात शिवाला वाहिल्या जातात.
या दिवसांमधे पाऊस भरपुर पडत असल्याने सगळीकडेच हिरवळ असते आणि अनेक वनस्पती उगवलेल्या असतात. दुर्वा, आघाडा, केना अश्या वनस्पती शिवपिंडीला वाहतात.
१०८ बेल शिवाची नामावली घेत वाहाण्याची प्रथा आहे. देवी पार्वतीला सौभाग्यलेणं वाहिलं जातं. पंचोपचार पुजा झाल्यानंतर नैवेद्य आरती आणि हरतालिका कथा वाचावी .
तिन्ही सांजेला जवळपासच्या सवाष्णींना बोलावुन हळदीकुंकवाचा घेऊ शकता
दुसऱ्या दिवशी दहिभाताचा नैवेद्य दाखवुन विसर्जन करण्यात येतं व वाळुने बनविलेली शिवपिंड वाहत्या पाण्यात विसर्जीत केली जाते.

See also पोलीस भरती -Police Bharti Exam Most Expected Questions with Answers

हरतालिका पुजा केव्हा करावी

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी श्रावणातल्या शुध्द तृतीयेच्या दिवशी सुवर्णगौरी… श्रावण मासातच कृष्ण तृतिया दिनाला कज्जली गौरी व भाद्रपद मासात शुध्द तुतियेच्या दिवशी हरितालिका व्रत करावे.

हरतालिका पुजा दिनांक 2022

31 ऑगस्ट 2022 ला हरतालिका पुजा आहे

हरतालिका फुलोरा l Hartalika fulora l

Leave a Comment