भारतीय रेल्वे तब्बल 2 लाख 63 हजार तर गृहमंत्रालयात तब्बल 1 लाख जागा रिक्त

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित व अराजपत्रित वर्गातील तब्बल 2 लाख 63 हजार 913 पद रिक्त असून सीआरपीएफ बीएसएफ यासारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये तब्बल एक लाख 14 हजार 245 जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्या ंच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार एक जुलै 2023 पर्यंत रेल्वेमध्ये राजपत्रित स्वर्गाची 2680 पदे आणि अराजपत्रित संवर्गाची दोन लाख 61 हजार 233 पदे रिक्त आहे

Indian Railway – दीड लाख जागांसाठी भरती सुरू

रेल्वेमध्ये 2.37 कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन एक लाख 39 हजार 50 उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे एक एप्रिल 2022 ते 30 जून 2023 या कालावधीत एक लाख छत्तीस हजार 773 उमेदवारांना विविध गट क पदाखाली समाविष्ट करण्यात आले आहे

केंद्रीय गृहमंत्रालय आणि त्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जसे की सीमा सुरक्षा दल सशस्त्र सीमा बल केंद्रीय राखीव पोलीस दल इंडो तिबेट सीमा पोलीस दल आसाम रायफल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व दिल्ली पोलीस मध्ये सध्या एक लाख 14 हजार 245 जागा रिक्त आहेत

Leave a Comment