इस्रो चंद्रयान 03 अंतर्गत भारताची 14 जुलैला चंद्रावर झेप । ISRO MOON 03 LANDING

इस्रो चंद्रयान 03 : संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्त्वकांक्षी चंद्रयान 03 मोहिमेची तारीख निश्चित झाली असून 14 जुलै रोजी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी या LMV 3 प्रक्षेपणयांनातून चंद्राकडे झेपावेल दिनांक 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

इस्रो चंद्रयान 03
ISRO MOON 03 LANDING इस्रो चंद्रयान 03

चंद्रयान दोन मोहिमेतील अपयशातून धडा घेतलेल्या लँडेर आता अधिक शक्तिशाली करण्यात आला असून तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केले जाणार आहे

चंद्रयान दोन मध्ये लँडरच्या पायांची क्षमता ही दोन मीटर प्रति सेकंद वेग सहन करण्याची होती त्यामुळे पृष्ठभागावर उतरताना हे वाण टिकू शकले नव्हते व रोवर सुद्धा चालू शकला नव्हता परंतु आता चंद्रयान तीन मधील लॅन्डरच्या पायाची क्षमता ही तीन मीटर प्रति सेकंद वेग सहन करण्यात इतकी वाढविण्यात आली आहे तसेच यात आता इंधन सुद्धा अधिक ठेवण्यात आले आहे

चंद्रयान तीन मोहिमेचे प्रमुख दोन भाग

चंद्रयान तीन मोहिमेचे प्रमुख दोन भाग असणार यामध्ये चंद्राची विज्ञान म्हणजे सायन्स ऑफ द मून या अंतर्गत चंद्राची आवरण शीला भूगर्भातील हालचाली पृष्ठभागावरील प्लाजमा चे प्रमाण तसेच लँडिंग स्थळाच्या आसपास असलेल्या चंद्रतील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जाणार आहे

चंद्रावरून विज्ञान हा दुसरा भाग असणार आहे ज्यामध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे या दुसऱ्या भागामध्ये चंद्रयान टू मध्ये काय सुधारणा करण्यात आल्या आहे चंद्रयान टू मध्ये केवळ लॅन्डर आणि रोव्हर होते परंतु चंद्रयान तीन मध्ये दोन वाहनांखेरीज प्रपोर्शनल हे तिसरे वाहन बसवण्यात आले आहे त्यामुळे चंद्राच्या भाषेतून पृथ्वीवरील वर्ण पटासह अन्य निरीक्षणे नोंदवता येणार आहे सोबतच नासाची सुद्धा काही उपकरणे चंद्रयान तीन मार्फत चंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत

चंद्रयान तीन चंद्रावर कधी उतरणार

23 किंवा 24 ऑगस्टला चंद्र पृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी जाहीर केले चंद्रावर 14 ते 15 दिवस सूर्यप्रकाश तर 14 ते 15 दिवस अंधार असतो आणि लँडिंग साठी सूर्यप्रकाश असणे आवश्यक असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन विक्रम उतरविले जाईल

Leave a Comment