जेष्ठागौरीची मराठी कथा व आरती | jyeshta gauri katha in marathi | jyeshta gauri aarti in marathi

jyeshta gauri katha in marathi : जेष्ठागौरीची मराठी कथा आपण या लेखात उपलब्ध करून दिली आहे सोबत jyeshta gauri katha in marathi pdf शेवटी लिंक आहे . तसेच जेष्ठागौरीची मराठी आरती सुद्धा दिली आहे . मराठी भक्ती करिता –https://marathijobs.in

भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.
ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते.

jyeshta gauri katha in marathi
jyeshta gauri katha in marathi

Jyeshta Gauri Vrat Pujan – जेष्ठागौरीची पूजन विधी

भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.

स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.

jyeshta gauri katha in marathi

जेष्ठागौरीची मराठी कथा | jyeshta gauri katha in marathi

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. एके दिवशी काय झाले ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई, आई, आपल्या घरी गौर आण ! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन ! मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा, घावनघाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील !

See also Motivation - होय मी हे करू शकतो

बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले.

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवले वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळे जण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावनघाटले देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल, असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलबाळसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणू ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशीची नाव घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याच दूध काढ ! ब्राह्मणाने तसे केले, गाई-म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले.

दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर ! ब्राह्मण म्हणू लागला आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचत्या कशा करू ? तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल ! म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग !

See also Maharastra Board Class 12 Hsc Economics Book PDF Download

गौरीने सांगितले, तुला येतांना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हाड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक असे केलेस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळी जावे. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत मिळेल. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईंच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

Source – Wikisource

जेष्ठागौरीची पूजा मुहूर्त 2022

  • ज्येष्ठा गौरी आव्हान मुहूर्त शनिवार, 3 सप्टेंबर 2022 – 06: AM ते 06:41 PM
  • ज्येष्ठा गौरी पूजन रविवार, 4 सप्टेंबर 2022
  • ज्येष्ठा गौरी विसर्जन सोमवार, ५ सप्टेंबर २०२२
  • अनुराधा नक्षत्र 2 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल – रात्री 11:47
  • अनुराधा नक्षत्र 3 सप्टेंबर 2022 – रात्री 10:57 ला संपेल

ज्येष्ठा गौरी आवाहन 2022: विधी

  1. सकाळी लवकर उठून स्वच्छता करतात.
  2. ते प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात.
  3. त्यांचे घर फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवा.
  4. मूर्ती घरी आणा.
  5. मूर्तीला नवीन कपडे, सिंदूर, दागिने, मंगळसूत्र इत्यादींनी सजवले जाते.
  6. माँ गौरीला प्रसन्न करण्यासाठी गौरी आरती आणि भजन करा.
  7. भाविक फळे, मिठाई आणि भोग प्रसाद देतात.
  8. स्त्रिया सहसा हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी घालतात जी मराठी परंपरेनुसार अत्यंत शुभ मानली जाते.
  9. विसर्जनाच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते.

जेष्ठागौरीची मराठी आरती | jyeshta gauri aarti in marathi

jyeshta gauri aarti in marathi

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा, अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा ।

गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१।।
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी ।

कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेवी जयदेवी ।। धृ।।

ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा, षडरस पक्वान्ने होती सुखधामा ।

सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।

।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।

उत्थापन मूळावर होता अगजाई, वर देती झाली देवी विप्राचे गृही ।

रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी, वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।

See also अफवांवर लगाम घालण्यासाठी फेसबुक कडून ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचे फीचर लॉन्च

।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।

सोन्याच्या पावलाने आरती मराठी

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।।

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || धृ .३ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती

सौभाग्याचे रक्षण

काही वेळा स्त्रिया स्वत:च्या सौभाग्याचे रक्षण होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला उद्देशून ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. त्यामुळे व्रत करणार्‍या स्त्रियांवर महालक्ष्मीदेवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते.

गौरी ची व श्रीगणेशाची कृपा होऊन सर्व इच्छा पूर्ती होते

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने श्री गणेशासह रिद्धी आणि सिद्धी यांचे कृपाशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या भरभराट होते अन् आध्यात्मिक क्षेत्रात विविध सिद्धींची प्राप्ती होते.

गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होणे

रिद्धी आणि सिद्धी यांसह कार्यरत असणारे गणेशतत्त्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने उपासकाला गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त 2022?

3 सप्टेंबर 2022 10:56 pm पर्यन्त

गौरी शब्दाचा अर्थ काय ?

संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार ‘गौरी’ म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पार्वती,

ज्येष्ठा गौरी पूजन 2022?

ज्येष्ठा गौरी पूजन रविवार, 4 सप्टेंबर 2022

ज्येष्ठा गौरी विसर्जन 2022 ?

ज्येष्ठा गौरी विसर्जन सोमवार, ५ सप्टेंबर २०२२

jyeshta gauri katha in marathi

Leave a Comment