भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

भूगोल – भारतातील खनिज संपत्ती
खनिज संपत्तीच्या बाबतीत भारताची गणना खनिज संपन्न राष्ट्रात होते .
– सर्व प्रकारची खनिजे भारतात आढळतात.
● बॉक्साइट :-
बॉक्साइटचे सर्वात जास्त उत्पादनझारखंड राज्यात होते.
– झारखंड नंतर छत्तीसगड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो .
– महाराष्ट्र, ओरिसा, मध्ये प्रदेश या राज्यातही बॉक्साइटचे साठे आहेत.
अल्युमिनियमचीनिर्मिती बॉक्साइट पासून होते
– बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने विमान व जहाज बांधणी तसेच सिमेंट व लोहपोलाद
कारखान्यात होतो.
– महाराष्ट्रात बॉक्साइटचे२९ %साठे आढळतात.
– महाराष्ट्रात कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, सांगली, सातारा इ. ठिकाणी साठे आढळतात.
लोहखनिज :-

– भारत हा लोहखनिज निर्यातक देश असून जगातील२०%साठे भारतात आढळतात.
– लोहखनिज उत्पादनात भारताचा६ वाक्रमांक लागतो.
– महाराष्ट्रात लोहखनिजचे साठे सिंधुदुर्ग, भंडारा चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी आढळतात.
– लोहखनिज प्रामुख्याने टॅकोनाईट व जांभा खडकात आढळते.
– महाराष्ट्रात२०%उत्पादन होते.
– लोहखनिजचे साठे झारखंड,प.बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, आ. प्रदेश इ. राज्यात आढळतात .
– लोहाच्या प्रमाणानुसार लोहखनिजचे
 मॅग्नेटाईट(७२%),हेमेटाईट(६०%),सिडेराईट(४८%) वलिमोनाईट(५०%)
असे चार प्रकार पडतात.
– यापैकी भारतातहेमेटाईटया प्रकारचे साठे सर्वाधिक आहेत.
● दगडी कोळसा :-

– दगडी कोळसा उत्पादनात भारत जगाततिसऱ्याक्रमांकावर आहे.
– भारतात झारखंड मध्ये सर्वात जास्त साठे आहेत.
– उत्पादनाच्या बाबतीतचीनचा प्रथमक्रमांक लागतो.
– कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचेअँथ्रासाईट(९५% पर्यंत),
 बिट्येमाईन(८५%-९०%),लिग्नाइट(६५%-७५%),पीट(५०%) पेक्षा कमी, असे चार प्रकार पडतात.
– पश्चिम बंगालमध्ये“राणीगंज “येथे भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण आहे .
– महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येवतमाळ येथे कोळशाचे साठे आढळतात.
● तांबे :-

तांबे उत्पादनात झारखंड, राजस्थान व आंध्र प्रदेश यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा
क्रमांक लागतो.
– महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर येथे तांब्याचे साठे आढळतात.
– राजस्थानमधीलखेत्रीयेथे तांब्याचे साठे आहे.
● अभ्रक :-

भारत उत्पादनात भारतप्रथम क्रमांकावर आहे.
– भारतात अभ्राकाचे उत्पादन झारखंड, राजस्थान व आंध्र प्रदेश येथे होते.
– महाराष्ट्रात अभ्ररकाचे साठे सिंधुदुर्ग व पूर्व विदर्भातील काही भागात आढळतात .
● मँगनीज :-

– मँगनीज उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
– भारतात ओरिसा, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड येथे प्रमुख साठे आहेत.
– महाराष्ट्रात४०%साठे सापडतात त्यापैकी भंडारा , नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे साठे आहेत.

● चुनखडी :-

– चुनखडी उत्पादन मध्ये प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक , ओरिसा, कर्नाटक येथे प्रमुख
साठे आढळतात .
– चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने बांधकामात केला जातो.
– महाराष्ट्रात चुनखडीचे९%साठे आढळतात.
– महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार रत्नागिरी इ. साठे आहेत.
● खनिज तेल :-

– भारत खनिज तेलाचा आयातदार देश आहे.
खनिजतेल उत्पादनात सौदी अरेबियाचा प्रथम क्रमांक लागतो.
– खनिज तेल मुख्यतः चुनखडक व वालुकाश्मत सापडतात.
– भारतातील सर्वात मोठाखनिज तेलाचा साठा मुंबई हाययेथे आहे.
– भारतातील पहिला तेलसाठा आसाममधील दिग्बोई.
– भारतात गुजरात, आसाम, राजस्थान,महाराष्ट्र या राज्यातही खनिज तेल उत्पादन होते.

● सोने :-

कर्नाटक मधीलकोलारयेथे भारतातील प्रमुख सोन्याच्या खाणी आहेत.
– आंध्रप्रदेशात सुद्धा सोन्याच्या खाणी आहेत.
● हिरे :-

– मध्ये प्रदेशातीलपन्नायेथील हिऱ्याच्याखाणी प्रसिद्ध आहेत.
– उत्तर प्रदेशातील बंदा , मर्झापुर येथेही खाणी आहेत.

● क्रोमाइट :-

क्रोमाइटचे सर्वात जास्त उत्पादन ओरिसा राज्यात होते.
– आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक येथे सापडतात.
– महाराष्ट्रात एकूण १०% साठे सापडतात.
– महाराष्ट्रात भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया व रत्नागिरी येथे साठे आहेत.
See also भूगोल भारत -- भारतातील महत्वाची सरोवरे - Bhartachi Mahtwachi Saroware

Leave a Comment