लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरू मुलीला मिळणार लाख रुपये

नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली असून एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलीला शासनामार्फत एक लाख रुपये मदत मिळणार असून या योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत

मुलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे

लेक लाडकी योजना पात्रता

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक

उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांच्या आत आहे अशा कुटुंबांना एक एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगी व एक मुलगा असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल

एक लाख एक हजार रुपये कसे मिळणार

जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये तसेच सहावीत गेल्यावर सात हजार रुपये व अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये व मुलगी जेव्हा अठरा वर्षाची पूर्ण होईल तेव्हा 75 हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे

See also आयुष्यमान भारत आरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून तब्बल 1900 आजारांवर होणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

Leave a Comment