महानगरपालिकेची मेगापद भरती करिता पुढील महिन्यात अर्ज प्रक्रिया

महानगरपालिकेची मेगापद भरती करिता पुढील महिन्यात अर्ज प्रक्रिया
महानगरपालिकेची मेगापद भरती करिता पुढील महिन्यात अर्ज प्रक्रिया

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेच्या अकरा विभागाच्या बहुप्रतिक्षित भरती प्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे यासोबतच अग्निशामन व आरोग्य विभागातील 704 पदांच्या भरती बाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून यासाठी चार आठवड्याचा म्हणजे साधारणता एका महिन्याचा वेळ लागणार आहे म्हणून ऑगस्ट महिन्याचे पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे

महापालिकेच्या 11 विभागांमध्ये सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर मेगा भरतीची प्रक्रिया करण्याकरिता मार्ग मोकळा झाला आहे मात्र भरती प्रक्रिया राबविण्याचे एजन्सीवरून वाद निर्माण झाल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती दरम्यान राज्य शासनाने आता टीसीएस या कंपनीची भरतीसाठी निवड केल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे

महापालिकेचे आस्थापनावरील तब्बल सात हजार पदे मंजूर असून त्यातील 2800 पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहे अपुऱ्या मनुष्यबळ मुळे कामाचे तान वाढले असून कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे तब्बल 21 वर्षापासून महानगरपालिकेत नोकर भरती झालेली नसल्याने प्रशासनही भरतीसाठी आग्रही आहे

एका महिन्याच्या कालावधी मध्ये सर्व ऑनलाईन चे कामे पूर्ण करून टीसीएस मार्फत स्वतंत्र वेबसाईट तयार केली जाणार असून ही वेबसाईट नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला कनेक्ट केली जाणार आहे त्यानंतर डीसीएसच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवाराकडून अर्ज मागविले जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे

Leave a Comment