Maharashtra Lockdown New Update : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील

Maharashtra Lockdown New Update : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील

job

राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. वीकेंड लॉकडाउनही करण्यात आला आहे. मात्र, करोना रुग्णवाढीला फारसा ब्रेक लागत नसल्याने आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन सरकार लॉकडाउनच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, याला आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही दुजारो दिला आहे.

लॉकडाउनची चर्चा सुरू असून, यापार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार.

“एसओपी (लॉकडाउन गाईडलाईन्स) निश्चित झाल्यानंतर किती दिवसांसाठी लागू केली जाईल, हे सर्वांनाच कळेल. टास्क फोर्समधील काही लोकांचं म्हणणं होतं की, २१ दिवसांचा लॉकडाउन लावावा. काही लोकांचं म्हणणं होतं की, लोकांना त्रास होईल त्यामुळे दोन आठवड्यांचा (१४ दिवसांचा) लावा. तर काहीचं म्हणणं होतं एक आठवडा लावावा

See also Marathi grammar book Pdf Download

Leave a Comment