Marathi Current Affairs 2022 | Marathi Chalu Ghadamodi | 11 July 2022

Marathi Current Affairs 2022 | Marathi Chalu Ghadamodi | 11 July 2022 | चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2022 |

Marathi Current Affairs 2022 | Marathi Chalu Ghadamodi | 11 July 2022 | चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2022

प्रश्न 1. विम्बल्डन टेनिस स्पर्धा मध्ये किरियॉसवर मात करत सलग चौथ्यांदा विम्बल्डनच्या, तर २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपद कोणी जिंकले?
उत्तर — नोव्हाक जोकोव्हिच
सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील सत्ता अबाधित राखताना रविवारी सलग चौथ्या जेतेपदावर कब्जा केला.
ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसवर चार सेटमध्ये मात करत जोकोव्हिचने कारकीर्दीतील २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. तसेच विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची ही तब्बल सातवी वेळ ठरली.
प्रश्न 2. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी कोणत्या देशातील मधील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फ केल्याची घोषणा केली.
उत्तर –– भारतासह जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरी
रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारतासह जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरीमधील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फ केल्याची घोषणा केली.
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे जोपर्यंत सरकारी कार्यालये सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसण्याचा निर्धार सरकारविरोधी चळवळीच्या नेत्यांनी रविवारी केला.
प्रश्न 3. कोणत्या देशात आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण झाली ?
उत्तर — श्रीलंका
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे जोपर्यंत सरकारी कार्यालये सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसण्याचा निर्धार सरकारविरोधी चळवळीच्या नेत्यांनी रविवारी केला.
प्रश्न 04 . टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी…….. खरेदी व्यवहार रद्द केले
उत्तर — ट्विटर
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याचे शुक्रवारी सांगितले. ट्विटरने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली.
प्रश्न 05 . श्रीलंकेचे पंतप्रधान …………… यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
उत्तर –रानिल विक्रमसिंघे
श्रीलंका आर्थिक संकटाला सामोरं जात आहेत. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलनं करत आहेत. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे.

प्रश्न 6:36 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोठे होणार आहे?
उत्तर– गुजरात

See also मराठी चालू घडामोडी - Current Affairs Marathi - २० जुलाई २०२२

प्रश्न 7: “राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा” साठी जाहीर झालेल्या राज्य क्रमवारीतकोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे ?
उत्तर –
ओडिशा

प्रश्न 8:अलीकडेचसंशोधकांनी “आर्यभट्ट-1” नावाच्या अॅनालॉग चिपसेटचा प्रोटोटाइप कुठे विकसित केला आहे?
उत्तर– IISc बंगलोर

प्रश्न 9:‘खरची उत्सव’अलीकडे कोठे सुरू झाला आहे?
उत्तरत्रिपुरा

प्रश्न 10:उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर
– आर के गुप्ता

प्रश्न 11: कोणत्या दोन बँकांना RBI ने आर्थिक दंड ठोठावला आहे?
उत्तर– कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक

प्रश्न 12:कोणत्या संघटनेचे सरचिटणीस ‘मोहम्मद सनुसी बर्किंडोयांचे निधन झाले आहे?
उत्तर– पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना (OPEC)

प्रश्न 13: सलग 13 T20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार कोण बनला आहे?
उत्तर– रोहित शर्मा

प्रश्न 14: ‘सायबर वॉल्टेज इन्शुरन्स प्लॅन’ लाँचकेलेली सामान्य विमा कंपनी कोणती आहे ?
उत्तरSBI जनरल इन्शुरन्स

प्रश्न 15:-तामिळनाडूतील ‘कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प’साठी तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यासाठी कोणत्या देशाने करार केला आहे?

उत्तर— रशिया

16. 10 जुलै हा दिवस ………………………. दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

उत्तर —10 जुलै

प्राध्यापक डॉ. हिरालाल चौधरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अलीकुन्ही यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड (NFDB) ने 10 जुलै 2022 रोजी NFDB हैदराबाद येथे 22 वा राष्ट्रीय हायब्रीड फिश फार्मर्स डे साजरा केला.या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते

मत्स्यपालनातून मत्स्य उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.

भारत सरकारने तामिळनाडूमध्ये समुद्री शेवाळ पार्क मंजूर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

NFDB आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ने FIDF आणि बिझनेस मॉडेल स्कीम सुलभ करण्यासाठी सामंजस्य करार केला.

See also 09 July 2022 Marathi Daily Current Affairs | Marathi Chalu Ghadamodi 2022 | चालू घडामोडी 2022

मत्स्यपालन आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) योजना 2018-2019 मध्ये सुरू करण्यात आली.

17. 2021-22 मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीने ……. कोटी चा उच्चांक गाठला आहे.

उत्तर —13,000 कोटींचा

सरकारी आकडेवारीनुसार, 2021-22 आर्थिक वर्षात संरक्षण निर्यातीत खाजगी क्षेत्राचा वाटा 70% आणि सार्वजनिक क्षेत्राचा 30% होता.2017 ते 2021 दरम्यान भारताची संरक्षण निर्यात 6 पटीने वाढली आहे.ती 2017 मध्ये 1,520 कोटींवरून 2021 मध्ये 8,435 कोटी इतकी वाढली आहे.क्षेपणास्त्रे, प्रगत हलकी हेलिकॉप्टर, किनारी गस्ती जहाजे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे आणि पाळत ठेवणारी यंत्रणा ही प्रमुख निर्यात होती. .

Leave a Comment