Hanuman Maruti Stotra In Marathi – मारुती स्तोत्र मराठी | Hanuman Stotra Marathi

Hanuman Maruti Stotra In Marathi : जय श्री राम मित्रांनो, मारुती ची असीम कृपा आपणास लाभो . आपण मारुती स्तोत्र वाचण्यासाठी किवा त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात . तर मित्रांनो मारुती स्तोत्र मराठी मध्ये पाहूया .

Hanuman Maruti Stotra In Marathi
Hanuman Maruti Stotra In Marathi

Hanuman Maruti Stotra In Marathi – मारुती स्तोत्र मराठी | Hanuman Stotra Marathi

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।

वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।

सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा।

पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।।

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।

काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।।

ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।।

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं।

सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।।

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू।

चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।

मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।।

आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती ।

मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।।

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे।

तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके।

तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।।

आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा ।

वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।

पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।

नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।।

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।

दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण।

रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।।

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

हे पण वाचा –

See also Pavitra Portal Maharashtra Government

मारुती हनुमान स्तोत्र जप पद्धत –

  • मारुती स्तोत्राचे सकाळी किंवा संध्याकाळी पठन करावे
  • आपण स्वतः ल शुद्ध करूनच मारुती स्तोत्र पठन करावे
  • हनुमानजींची विधिवत पूजा करा.
  • पठण करताना मनात हनुमानजींचे ध्यान करा.
  • एका स्वरात, लयबद्ध पद्धतीने मजकूर पाठवा.
  • मोठ्याने ओरडू नका.
  • पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करू नये.
  • याशिवाय दारू, सिगारेट, पान-मसाला किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये.

शनिवारी व मंगळवारी मारुती हनुमान स्तोत्र पठण केल्याने होणारे फायदे –

  • घरात धनधान्याची वृद्धी होते.
  • भीती नष्ट होते.
  • रोग व कष्टांचे निवारण होते.
  • नकारात्मक शक्तींचा, विचारांचा नाश होतो
  • सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
  • सुख, शांती आणि उत्तम आरोग्य आपल्याला मिळते.

Hanuman Maruti Stotra In Marathi PDF – मारुती स्तोत्र मराठी pdf

तुम्हाला मारुती स्तोत्र pdf download साठी खाली लिंक दिली आहे

Maruti Stotra in Marathi PDF डाऊनलोड

निष्कर्ष :

तरी मित्रांनो आपणास Hanuman Maruti Stotra In Marathi – मारुती स्तोत्र मराठी मध्ये उपलब्ध करून दिला . तरीही आमच्या पोर्टल ला भेट दिल्या बद्दल आभारी आहोत . काही प्रश्न किवा शंका असल्यास कॉमेंट करा आम्ही आपल्या शंकाचे प्रश्नाचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू .

1 thought on “Hanuman Maruti Stotra In Marathi – मारुती स्तोत्र मराठी | Hanuman Stotra Marathi”

Leave a Comment