मोबाईल फोन हरवला गेला तरी आता नो टेन्शन पटकन शोधून मिळेल – Mobile phone Find easily

मोबाईल फोन हरवला गेला तरी आता नो टेन्शन पटकन शोधून मिळेल – Mobile phone Find easily

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर आपण खूप बेचैन होत असतो अनेकदा पोलिसांमध्ये सुद्धा आपण तक्रार देतो परंतु मोबाईल काही परत आपल्याला मिळत नाही मात्र आता मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण सरकारने आता नवीन एक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे मोबाईल फोन ब्लॉक किंवा ट्रेस करण्यासाठी ट्रेकिंग सिस्टीम सुरू केलेली आहे

17 मे रोजी जागतिक संचार दिवसाच्या दिनानिमित्त सरकारने मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रेकिंग सिस्टीम सुरू केली आहे केंद्रीय दुरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी संचार साथी पोर्टल त्यांनी लॉन्च केला आहे यामुळे आता जे मोबाईल चोरीला जातील आणि किंवा हरवतील त्यांना ट्रेक करणार आता सोपं होणार आहे

सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेली मॅटिक्स सध्या दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंच कार्यालयामध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे जो आता संपूर्ण भारतामध्ये सुद्धा लागू होणार आहे

हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन कसा शोधणार

ऑपरेटर आणि सी आय आर सिस्टीमला डिवाइस चा आय एम आय नंबर आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबरची माहिती असेल काही राज्यांमध्ये याचा उपयोग हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी ही माहिती वापरली जाणार

  • तब्बल 4.700 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल या पोर्टल द्वारे ब्लॉक करण्यात आली आहेत
  • आतापर्यंत तब्बल 2.40 लाख पेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करण्यात आलेले आहे
  • 8000 पेक्षा जास्त फोनही या द्वारे जप्त करण्यात आलेले आहे

आय एम आय नंबर जर बदलला तर काय

जर तुमचा आय एम आय नंबर बदलण्यात आला तरीसुद्धा आता तुम्हाला काळजी करायचं काम नाही दुसऱ्यांच्या नेटवर्कवर लोड केलेल्या मोबाईल फोनचा वापर शोधण्यासाठी सी-डेट ना नवीन वैशिष्ट्य आणली आहे सध्या गुन्हेगार मोबाईल चोरल्या नंतर मोबाईलचा आय एम आय क्रमांक बदलतात त्यामुळे मोबाईल ट्रॅक किंवा ब्लॉक होत नाही हे पोर्टल आय एम आय नंबर बदलल्यानंतरही डिवाइस ट्रॅक आणि ब्लॉक करण्यासाठी सक्षम असणार आहे

See also इस्रो चंद्रयान 03 अंतर्गत भारताची 14 जुलैला चंद्रावर झेप । ISRO MOON 03 LANDING

मोबाईल युजर्स साठी काय असणार अट

सरकारने भारतात मोबाईल उपकरणाची विक्री करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख म्हणजेच आय एम आय 15 अंकी क्रमांक उघड करणे बंधनकारक असणार

या प्रणालीचा नेमका फायदा कोणाला होणार

जवळपास तीन महिन्यांमध्ये संपूर्ण भारतामध्ये ही प्रणाली राबवली जाणार आहे त्याच्यामुळे ज्यांचं मोबाईल चोरीला किंवा हरवला जाईल टेक्नॉलॉजी मुळे फायदा होणार आहे

1 thought on “मोबाईल फोन हरवला गेला तरी आता नो टेन्शन पटकन शोधून मिळेल – Mobile phone Find easily”

Leave a Comment