Mumbai MahanagarPalika : मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 1797 जागा रिक्त : शिपाई माळी हमाल आदी पदांचा समावेश

Mumbai MahanagarPalika : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांअंतर्गत शिपाई पदाची एकूण १ हजार ७९७ पदे रिक्त आहेत. तर, ३९१ हमाल आणि १२२ माळी आणि रखवालदारांची पदे रिक्त आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. या माहितीतून शिपाई, हमाल आणि माळी- रखवालदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याचे समोर आले आहे mumbai mahanagar palika recruitment

किती पदे आहेत रिक्त पहा

  • शिपाई पदाची एकूण मंजूर पदे २ हजार ६३५ असून रिक्त पदांची संख्या १ हजार ७९७ आहे.
  • हमाल ही पदे ६०२ असून सध्या ३९१ पदे रिक्त आहेत.
  • तर माळी आणि रखवलदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ आहे.

शिपाई पद हे रिक्त असल्याने होत आहे कामात अडचण

शिपाई हे पद महत्त्वाचे असून हे पद रिक्त असल्याकारण दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असून जिल्हा परिषदेच्या शाळा हे पण भरायची शासनाकडे मागणी करत आहे

शिक्षण विभागाने निधी वाढवला असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, असे पत्र गलगली यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

Leave a Comment