My favorite festival in marathi – माझा आवडता सन

नमस्कार मित्रानो , भारत देश हा विविधतेने नटलेला एक समृध असा देश ज्यात अनेक जाती धर्माचे लोक राहतात . प्रत्येक धर्माचे एक वेगळे विशेष महत्व आहे. प्रत्येक धर्मात काही सन उत्सव साजरे केले जातात. जसे दिवाळी होळी रमजान क्रिसमस आज च्या लेखात आपण My Favorite Festival बाबत निबंध लेख पाहणार आहोत .

My favorite festival in marathi – माझा आवडता सन

My favorite festival in marathi -माझा आवडता सन

दिवाळी – diwali :-

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा सण भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे दिवे लावले जाते तसेच घरावर आकाशकंदील लावला जातो. घराच्या बाहेर रांगोळी काढली जाते

दिवाळी सण केव्हा असतो Diwali Festival Duration

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान येत असतो

My favorite festival in marathi -माझा आवडता सन
दिवाळी सन माहिती

दिवाळीची तयारीDiwali Festival Preparation

दिवाळीमध्ये घराची साफसफाई व रंगोटी केली जाते व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची सुद्धा साफसफाई व रंगरंगोटी करतात.

जुनी समजूत आहे की या दिवशी देवी लक्ष्मी घरात येते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. या दिवशी आपण सर्व मातीचे दिवे तेलाने लावतो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवसात बाजारपेठा नवीन वस्तूंनी भरलेल्या असतात आणि या दिवसात बाजारपेठांमध्ये खूप गर्दी असते. लोक त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेतात व मुलं स्वतःसाठी फटाके आणि नवीन कपडे घेतात आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात.

खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे . मुली घराबाहेर रांगोळी काढतात. मुले आकाशकंदील लावतात. असा हा दिवाळी माझा खूप आवडता सण आहे

See also कलम 307 मराठी मध्ये संपूर्ण माहिती दंड शिक्षा जमानत - IPC 307 IN MARATHI MAHITI

दिवाळीचा सणDiwali Festival

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या एक दिवस आधी येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह असतो आणि लोक भांडी, सोने, चांदी इत्यादी खरेदी करतात. दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या दारात रांगोळी काढतो आणि फुलांच्या हारांनी घर सजवतो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. नंतर, प्रसाद घेतल्यानंतर, आम्ही टेरेस आणि खोल्यांमध्ये दिवे लावतो. आजूबाजूला दिवे लावल्यानंतर आम्ही गच्चीवर जाऊन फटाके फोडण्याचा आनंद घेतो.

मला हा सण खूप आवडतो कारण या उत्सवात एक साधेपणा आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करते तेव्हा मला ते आवडते. प्रसाद म्हणून लाडू खायला मिळतात. आजूबाजूला फक्त प्रकाश आहे जो अतिशय आकर्षक आहे.

दिवाळीनिमित्त माझ्या शाळेला सुट्टी व स्पर्धा Diwali Festival Holiday

दिवाळीनिमित्त माझ्या शाळेला सुट्टी असते व दिवाळीच्या सुट्टीपूर्वी माझ्या शाळेत रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. मला रांगोळी काढायची खूप आवड आहे तसेच इतर विद्यार्थी ज्यांना रांगोळी काढण्याची आवड आहे या स्पर्धेत भाग घेतात आणि रांगोळी काढून आपली कला दाखवतात. रांगोळी स्पर्धा गटात आयोजित केली जाते. विद्यार्थी फुले, रंग, तांदूळ, पीठ इत्यादींच्या मदतीने रांगोळी काढतात, सर्वोत्तम रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते.

या सणाबद्दल आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि आपल्यातील कलागुणांना बाहेर काढण्याची संधी मिळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीचे लाडूचे वाटपही केले जाते.

दिवाळी सण साजरे करण्यामागे धार्मिक श्रद्धा

भगवान श्री राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. वनवासात रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले आणि भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले व अयोध्येला परतले. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ लोकांनी तेला तुपाचे दिवे लावून जल्लोष उत्सव साजरा केला

See also Threads - थ्रेडस ॲप माहिती - थ्रेडस ॲप व twitter मधील फरक - थ्रेड्स ॲप डाऊनलोड लिंक

दिवाळी सन म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रदूषणमुक्त दिवाळी – Pollution Free Diwali

दिवाळी च्या दिवशी बरेच लोक फटाके फोडतात . फटाक्यांमधून भरपूर प्रमाणात धूर बाहेर निघतो, त्यामुळे आपले वातावरण प्रदूषित होते. म्हणून ग्रीन फटाके विकत घ्यावे व फोडावे जेणेकरून निसर्गाला हानी होणार नाही .कारण निसर्ग हे प्रथम दैवत आहे.

निष्कर्षConclusion :

दिवाळीच्या या सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही हा सण साजरा केला जातो.आपणास हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा .

Leave a Comment