नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणार या योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 24 चे अंतरसंकल्पीय भाषणात नमो शेतकरी सन्मान महानिधी ही योजना घोषित केली होती केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्षी एका शेतकऱ्यास सहा हजार रुपये अनुदान मिळते यात राज्याचा आणखी सहा हजार इतक्या निधीचा भर घालणारी नमो महासंबंधी योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली

किती निधी वाटप करण्यात येणार

1720 कोटी रुपये इतका निधी पहिल्या त्या पोटी वितरित करण्यात येईल त्यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे

पैसे खात्यात असे येणार

निधीचे वितरण पीएफ एम एस या प्रणाली तून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट केले जाणार आहे पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महाजन्म निधी योजनेचे मॉडेल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महा आयटी कडून सुरू आहे

तांत्रिक कार्या लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली

या योजने अंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे

किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता लवकरात जमा होणार

केंद्र सरकारच्या पीएम किसान निधी योजनेचा पंधरावा हप्ता सुद्धा दिवाळीआधी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 2000 व राज्य सरकारचे 2000 असे 4000 रुपये अनुदान मिळण्याची शक्यता दिवाळीपूर्वी आहे

See also मराठा आरक्षण मोठी बातमी अपडेट

Leave a Comment