शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

शारदीय नवरात्री उत्सव 2023 : शारदीय नवरात्र उत्सव रविवार 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे

Durga Devi

शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेचा मुहूर्त 2023

शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मूर्त सकाळी आठ दुपारी साडेबारा असा आहे

यावेळी वातावरणात शुक्र बुध आणि चंद्र ग्रहाचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव राहणार

शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे स्थापना करावी या दिवशी मातामह श्राद्ध असून 30 एप्रिल 2023 रोजी वक्री झालेला प्लूटो मार्गी लागणार आहे

नवरात्राच्या काळात 17 सप्टेंबर रोजी सूर्य तुळ राशीत प्रवेश करेल तर 18 ऑक्टोबर रोजी विनायक चतुर्थी असून बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे म्हणून बुधादित्य समन्शी योग तयार होईल

19 ऑक्टोबर गुरुवार रोजी ललिता पंचमी असून उपांग ललिता पूजन करावे

20 ऑक्टोंबर रोजी सरस्वती आव्हान करावे

21 ऑक्टोबरला सरस्वती व महालक्ष्मीची पूजन करावे याच दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करावा

22 ऑक्टोंबर रोजी महा अष्टमी चा उपवास करावा

23 ऑक्टोंबर रोजी नवमी उपवास करून नवरात्र उत्सवाची समाप्ती केली जाईल या दिवशी हेमंत ऋतूचा प्रारंभ होणार आहे हा दिवस नवरात्री मधील अतिशय शुभ दिवस असणार आहे

वयोमानामुळे किंवा तब्येतीमुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर दोन दिवस उपास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपास करावा हे नसेल जमत तर नऊ दिवस रोज भोजके खावे

नवरात्र चे नऊ रंग 2023

ज्योतिष्य शास्त्रानुसार 15 ऑक्टोंबर रोजी केसरी रंग

  • 16 ऑक्टोंबर रोजी पांढरा रंग
  • 17 ऑक्टोबर रोजी लाल रंग
  • 18 ऑक्टोंबर रोजी निळा रंग
  • 19 ऑक्टोबर रोजी पिवळा रंग
  • 20 ऑक्टोबर रोजी हिरवा रंग
  • 21 ऑक्टोंबर रोजी करडा रंग
  • 22 ऑक्टोंबर रोजी गुलाबी रंग व
  • 23 ऑक्टोबर रोजी जांभळा रंग वापरावा
See also आनंदाची बातमी : आता शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा मिळणार - Shetkari Pik Vima Yojna

Leave a Comment