50 हजार उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ

नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 21000 रुपये उत्पन्न मर्यादा आहे ती उत्पन्न मर्यादा वाढवून 50 हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल अशी माहिती विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेमध्ये दिली

संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजना चे राज्यात आहेत 41 लाख लाभार्थी

या दोन्ही योजनांचे राज्यात तब्बल 41 लाख लाभार्थी आहेत या योजनांवर सरकार साडेसात हजार कोटी खर्च करत आहे उत्पन्न मर्यादा 50 हजार रुपयांनी वाढवली तर सरकारवर अधिक भार पडेल म्हणून टप्प्याटप्प्याने उत्पन्न मर्यादा वाढवली जाईल असे मुश्रीफ यांनी सांगितले

niradhar income limit

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली होती त्याच उत्तर देताना मुश्रीफ यांनी ही माहिती दिली निराधार महिलांना या योजनेचा आधार आहे त्यातही उत्पन्न मर्यादेच्या 21 हजाराच्या अटीमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे याचा दाखलाही वेळेवर मिळत नाही असा मुद्दा प्रणिती शिंदे यांनी मांडला होता

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आमदार निधी देताना पैसे कमी पडत नाहीत पण गोरगरिबांना मदत करताना पैसे कमी पडतात असा टोला मुश्रीफ यांना लगावला इतर सदस्यांनीही उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी केल्यानंतर 50 हजार रुपये उत्पन्न मर्यादा करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाईल असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले

See also राज्यात सुमारे इतके रेशन कार्ड होणार रद्द - Ration Card New Update

Leave a Comment