नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात 350 जागांची भरती

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्याकरिता बिंदू नामावली निश्चित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

IMG 20230625 112415 911
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात 350 जागांची भरती

कर्मचाऱ्यापासून दुय्यम निबंधकापर्यंतची पदे भरली जाणार आहेत सुमारे साडेतीनशे जागा करिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची नोंदणी व मुद्रांक विभागाकडून सांगण्यात आले आहे

नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये लिपिका पासून ते दुय्यम निबंधकापर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षापासून रिक्त आहेत यामुळे लिपिकाकडे दुय्यम निबंधकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्त नोंदणी करताना नियमाचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षापासून निदर्शनास येत आहे

त्यातून बेकायदा पद्धतीने दस्त नोंदणी झाल्याची प्रकरणी उघडकीस येऊन संबंधितावर कार्यवाही देखील झाली आहे काही पदांवर अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे त्यामुळे या पदांवरील अधिकारासह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी 78 तर ययंदा 49 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तसेच उर्वरित वर्ग 3 आणि 4 ची पदेही भरण्यात येणार आहेत

See also कृषी सेवक वेळापत्रक जाहीर

Leave a Comment