Online Learning Driving License: आता बनवा तुमचं लर्निंग लायसन्स Online

Online Learning Driving License: आता बनवा तुमचं लर्निंग लायसन्स Online

Online Learning Driving License: आता बनवा तुमचं लर्निंग लायसन्स Online

शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी आरटीओत जाऊन परीक्षा द्याावी लागते. आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे.

त्यासाठी आधार जोडणी महत्त्वाची असून कोणतीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल.
ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून लवकरच आणली जाणार आहे.
यामुळे परीक्षेसाठीच्या आरटीओतील खेपा देखील टळणार आहेत.
लवकरच या सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाकडून घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार असणे गरजेचे आहे.
परीक्षा देण्यासाठी परिवहनच्याparivahan.gov.inया संकेतस्थळावर लायसन्स सुविधा उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक एन्टर केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करु शकेल. अर्ज प्रक्रिया पार पाडताच त्याला शुल्क भरावे लागेल आणि रस्ते सुरक्षेचा एक व्हिडीओ येईल.
तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रियेत त्याला परीक्षा द्याावी लागणार
परीक्षा दिल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीला परीक्षा पास झाल्याचे ऑनलाईन समजेल. तसेच मोबाईलवर संदेशही येईल. त्याचवेळी पास झालेल्यांना ऑनलाईन शिकाऊ लायसन्स उपलब्ध होणार आहे. त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी लागेल.
See also Air India Air Transport Services Limited (AIATSL) WALK-IN RECRUITMENT

Leave a Comment