नाव सातबारा शेतकऱ्याचा पैसा जातो केंद्र चालकाच्या खात्यात नवीन पिक विमा फसवणूक प्रकार

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा ची घोषणा केली परंतु अनेक csc केंद्र चालकांनी परस्परच अनेक शेतकऱ्यांचा पिक विमा भरून पिकाच विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये वळती करण्याचा प्रयत्न केला आहे अशी चार केंद्रे सध्या निष्पन्न झाली आहे

मागील आठवड्यात दोन वेळेस अतिवृष्टी झाली अद्याप ती नुकसान भरपाई मिळाली नाही दुबार पेरण्याचा संकट असताना आता पीक विमा भरणा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना गडविण्याचा प्रकार समोर आला आहे

पिक विमा भरण्याची मुदत संपल्यानंतर ही जवळपास 30 हजारावर शेतकरी विमा भरू शकले नाही विशेष म्हणजे यातील हजारो शेतकऱ्यांच्या नावावर केंद्र चालकांनी त्यांचा सातबारा आणि इतर कागदपत्रांचा वापर करून एक रुपयांमध्ये विमा भरला

केंद्र चालकांनी बँक खाते क्रमांक आपले किंवा नातेवाईकांचे टाकले त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा आला तरी तो थेट केंद्र चालक किंवा त्याच्या नातेवाईकांच्या खातात जमा होणार आहे या ऑनलाइन लुटीबाबत शेतकरी मात्र अनभीन्न आहे

तब्बल 30000 वर शेतकऱ्यांच्या तक्रारी

पिक विमा कंपनीकडे जवळपास 30 हजारांवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे यावरून जिल्ह्यातील अनेक सीएससी केंद्र चालकांनी अशाच प्रकारे बोगसपणा केल्याचे दिसून येते सर्व तक्रारींची खोलात जाऊन चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

केंद्र चालक रातोरात झाला शेकडो एकराचा मालक

कंदार शहरातील एका केंद्र चालकाकडे केवळ दीड एकर शेती आहे या केंद्रावर जवळपास 600 शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्यात आला त्यातील 160 शेतकऱ्यांचा विमा या केंद्र चालकाने परस्पर काढला असूनही कबुली त्याने दिली संबंधित 160 शेतकरी पिक विमाच्या रकमेला मुकणार आहेत

See also सहकार विभाग भरती परीक्षा वेळापत्रक - Sahakar Bharti Time Table

Leave a Comment