प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत 3.5 लाख महिलांच्या खात्यात थेट 195 कोटी रुपये

प्रधानमंत्री मातृ वंदना(PMMVY) योजनेचा दुसरा टप्पा 12 ऑगस्ट पासून सुरू होत आहे यात पहिल्या अपत्याला 5000 व दुसरी मुलगी असल्यास हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे

यासाठी राज्यातील तीन लाख 58 हजार गर्भवती व माता पात्र आहेत यांच्या खात्यावर शनिवारी एकाच वेळी पाच हजार व सहा हजार रुपये याप्रमाणे 195 कोटी 80 लाख रुपये जमा केले जाणार आहेत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक केंद्र शासनाची प्रायोजित डीबीटी योजना आहे ज्यामध्ये गर्भवती महिलांना तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना बँक किंवा डाकघर खात्यामध्ये 5000 प्रोत्साहन भत्ता दिला जात असतो

या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी पाच हजार रुपये दिले जात होते गर्भवती असताना तीन हजार रुपये व बाळ जन्मल्यानंतर पहिल्या लसीकरणाच्या वेळेस दोन हजार असे पाच हजार रुपये वितरित केले जाते

आता सरकारने या योजनेमध्ये दुसरी मुलगी झाल्यास ₹6,000 रुपये देण्याचा निर्णय केला आहे याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे

पहिले आपत्य आहे अशांना पाच हजार रुपये तर एप्रिल 2022 नंतर दुसरी मुलगी आहे अशांना 6000 रुपयाचा लाभ यामधून मिळणार आहे

अर्ज कोठे भरावा

अर्ज भरण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोबाईल ॲप विकसित केले आहे हे अँप आशा स्वयंसेविकांकडे आहेत त्यांच्या माध्यमातून आपणाला हा अर्ज भरता येणार आहे आपणाला आपल्या संबंधित अंगणवाडी आशा सोबत संपर्क करणे व आवश्यक कागदपत्र देणे आवश्यक असणार आहे अंगणवाडी सेविका ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून आपला अर्ज सबमिट करून देईल

अर्ज भरण्यास कोणत्या अडचणी येत आहे

आशाताईंकडे मोबाईल नाही ही एक सर्वात मोठी अडचण आहे तसेच हे पोर्टल मधातच बंद पडत आहे त्यामुळे अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे जेव्हा तुम्ही कागदपत्र सबमिट करता तेव्हा कागदपत्र घेत नाही म्हणून यामध्ये सुधारणा करण्याची मागणी पुढे येत आहे

See also महाराष्ट्रात EWS प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवायचे? - EWS PRAMAANPATRA ONLINE MAHARASHTRA

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख

या योजनेचा दुसरा टप्पा 12 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे राज्यातील सर्व विभाग समन्वयकाची ऑनलाईन बैठकी बुधवारी झाली आहे जास्तीत जास्त अर्ज भरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेले आहे

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ऑफिशियल वेबसाईट कोणती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी सरकारने पोर्टल बनवले आहे https://pmmvy.nic.in

या योजनेसाठी कोणते ॲप आहे प्लेस्टोर वरून आपण यासाठी उमंग नावाची ॲप डाऊनलोड करू शकता

Leave a Comment