Police Bharti 2023-24 FAQ

Police Bharti 2023-24 FAQ – पोलीस भरती काही महत्वाचे प्रश्न उत्तरे

1) मराठा उमेदवार EWS मधून अर्ज करू शकतो का ?
◾️ नाही करू शकत.
◾️ कारण – मराठा उमेदवार हा 26 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेश नुसार ओपन प्रवर्गात राहिला नाही व EWS म्हणजेच ओपन प्रवर्गातील आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेला उमेदवार व या अंतर्गत आता मराठा उमेदवार देत नाही EWS मध्ये अर्ज नाही करू शकत…

2) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज भरावा की SEBC…?
◾️ सध्या तरी SEBC मधून च अर्ज करावा जर हे आरक्षण नाही टिकले तर ews किवा ओपेन चा पर्याय मिळेल

3) SEBC आरक्षण मध्ये अर्ज केला तर काय होईल ?
◾️ जर तुम्ही SEBC मध्ये अर्ज केला व ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल ओपन किंवा EWS प्रवर्गात जाण्यासाठी मागच्या भरतीला झाले होते तसे व SEBC च्या जागा OPEN मध्ये धरल्या जातील.
◾️ जुने SEBC चालणार काय ?

>> नाही

4) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज केला तर काय ?
◾️ तुम्ही मैदानी व लेखी नंतर जर अंतिम निवड यादीत तुमचे नाव आले व EWS मधील इतर कास्टच्या उमेदवारांच्या हे लक्षात आल्यास ते आक्षेप घेऊ शकतात व त्यामुळे नुकसान होऊ शकते.

5) डबल फॉर्म भरता येईल का….?
◾️अजिबात भरता नाही येणार.
◾️ कारण – जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की एका घटकात एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तसेच बरीच सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कुणीही काहीही सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका बाकी तुमची इच्छा तुम्ही तेवढे हुशार आहातच….!

6) अर्ज करण्याची मुदत वाढ होईल का..?
◾️ हो आणि नाही पण….
◾️ दरवर्षी विद्यार्थी शेवटच्या चार ते पाच दिवसात अर्ज करतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे संकेतस्थळावर लोड येतो व मुदत वाढ साठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते व मदत वाढ मिळते यावर्षी देखील तसे होऊ शकते किंवा नाही सुद्धा…

See also महानगर पालिका भरती अपडेट 2022 | Mahanagar Palika Bharti Update

7) भरतीमध्ये वय वाढ मिळेल का ?
◾️ याबाबतीत अजून निश्चित माहिती नाही परंतु राजकीय नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे येत्या काही दिवसात समजेल वय वाढ मिळेल की नाही परंतु एक वर्ष वय वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत…

8) 31 मार्च 2024 पर्यंतचे नॉन क्रिमीलेअर चालेल का ?
◾️ हो चालेल.
◾️ परंतु तरीही तुम्ही उद्या परवा मध्ये नवीन नॉन क्रिमीलेअर साठी अप्लाय करून ठेवा व भरती दरम्यान तेही सोबत असू द्या.

9) मैदानी व लेखीसाठी किती वेळ मिळेल ?
◾️ साधारणता मैदानी चाचणीसाठी तीन महिने व लेखी परीक्षेसाठी चार महिने इतका अवधी मिळेल यात कमी जास्त होऊ शकते परंतु कधीही पेपर झाला किंवा मैदानी चाचणी झाली तर आपण स्पर्धेत टिकले पाहिजे त्याच्या तयारीत राहावे

10) NCC चे गुण कुणाला मिळतील ?
◾️अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलीस साठी एनसीसी गुण मिळतील व चालक आणि SRPF साठी मिळणार नाहीत.
◾️ अंदाजनुसार बँड्समन व कारागृह पदासाठी देखील एनसीसी मिळू शकतात.

Leave a Comment