प्री पेमेंट कर्ज फेडणे किती फायदेशीर जाणून घ्या । Pre Payment Loan Benefit

Pre Payment Loan Benefit : गृह कर्ज घेतले की ते 10 ते 30 वर्षापर्यंत चालते कर्जाची परतफेड लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी आपण अनेकदा गृह कर्जाचे प्री पेमेंट करत असतो त्याचे फायदे नक्कीच आहे पण काही वेळा नियोजनाच्या अभावामुळे इतर तोटेही होतात गृह कर्जामध्ये प्री पेमेंट चे फायदे व तोटे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया

फ्लोटिंग रेट वर घेतलेल्या गृह कर्जाच्या प्री पेमेंट वर सामान्यतः कोणतेही शुल्क भरावे लागत नाही परंतु तरीही सावधगिरी म्हणून कर्जाचे प्री पेमेंट करण्यापूर्वी याबाबत माहिती घ्या प्रथम तुमच्या बँकेकडून सर्व अटी व शर्ती जाणून घेणे आवश्यक आहे त्यानंतरच प्री-पेमेंटचा निर्णय घ्या

जरा आपण गृह कर्जाच्या व्यतिरिक्त वैयक्तिक किंवा कार लोन किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही गृह कर्जापूर्वी दुसरे कर्ज बंद करावे कारण या सर्व कर्जावरील व्याजदर हे गृह कर्जा पेक्षा अधिक असते म्हणून अशा वेळेस गृह कर्ज प्री पेमेंट करणे नुकसानदायक ठरू शकते

इमर्जन्सी फंड चा वापर गृह कर्जाच्या पेमेंट साठी अजिबात करू नका यामुळे तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते

गृह कर्ज 20 ते 30 वर्षाचे असेल अशा परिस्थितीत कर्जाच्या सुरुवातीला टप्प्यामध्ये प्री-प्रीमेंट केले तर लाखो रुपयांचे व्याज वाचू शकते व यामुळे तुमची ईएमआय कमी होऊ शकते तुम्ही उशिरा प्री-पेमेंट करत असाल तर तुमच्याकडे शिल्लक असलेला अधिकचा पैसा इतर ठिकाणी गुंतवा गृह कर्ज वेळ आधी फेडणे अधिक फायदेशीर ठरते

लाखो रुपये कसे वाचवाल

प्रत्येक महिन्याला एम आय सोबत प्री पेमेंट म्हणून बँकेत एक रक्कम जमा करा तेव्हा कर्जाच्या मूळ रकमेतून ती रक्कम वजा होते त्यामुळे मूळ रक्कम ही कमी होत जाते पेमेंट आपण कर्जाची वेळेपूर्वी परतफेड करतोच शिवाय लाखो रुपयांचे व्याजही यामुळे वाचतो. मूळ रक्कम कमी केल्यामुळे ईएमआय देखील कमी होते आणि क्रेडिट स्कोर सुद्धा वाढायला मदत होते फ्री पेमेंट केल्यामुळे कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम आहे अशी लक्षात येते त्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे सुद्धा सहज होते

See also Education Loan Information In Detailed

Leave a Comment