Ration card documents list in Marathi । नवीन राशन कार्ड काढण्याकरिता लागणारे कागदपत्र यादी

Ration card documents list in Marathi : विभक्त नवीन राशन कार्ड काढण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल अर्जामध्ये आपणाला खालील बाबी नमूद कराव्या लागतील

आधार क्रमांक

आपले संपूर्ण नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव

जन्मतारीख

पत्ता

जुनी शिधापत्रिकेमध्ये नाव असेल तर त्या शिधापत्रिकेचा तपशील

मोबाईल क्रमांक

रेशन दुकान क्रमांक

यासोबत आपणास खालील कागदपत्रे जोडावे लागतील

अर्जदाराचा फोटो

अर्जदाराचा राहण्याचा पत्त्याचा पुरावा

मतदार ओळखपत्र/ पारपत्र / वाहनचालक अनुद्यप्ती / आर एस बी वय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र/ पॅन कार्ड / म रारोहायो जॉब कार्ड/ आधार कार्ड ( यातील आपण कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र जोडावे )

अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा

मतदार ओळखपत्र/ पारपत्र / वाहनचालक अनुद्यप्ती / आर एस बी वय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र/ पॅन कार्ड / म रारोहायो जॉब कार्ड/ आधार कार्ड ( यातील आपण कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र जोडावे )

वयाचा पुरावा:-

प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला


उत्पनाचा दाखला:-

अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणि ८-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं . १६ / सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र

सध्याची मूळ शिधापत्रिका किंवा नाव कमी केल्याचे प्रमाण पत्र

शिधापत्रिकेसंदर्भातील अर्ज

(कृपया अर्ज सादर करताना रू.२ चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा.)

See also ग्रामपंचायत रहिवासी दाखला PDF - rahivashi dakhla format in marathi pdf

Leave a Comment