Bharti Update : सहकार आयुक्त अंतर्गत 751 पदांची लवकरच भरती होणार सुरू

Bharti Update : मित्रांनो सहकार आयुक्त अंतर्गत 751 पदांच्या भरती करिता लवकरच जाहिरात येणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने 75 हजार पदांची भरती विविध विभागात सुरू केली आहे म्हणून सहकार आयुक्तालय अंतर्गत 751 पदांची भरती केली जाणार आहे लिपिक टंकलेखन चे पद हे एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहे ही भरती 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती येत आहे

30 सप्टेंबर 2022 च्या जीआर नुसार या विभागाचा आकृती बंध मंजूर आहे अशा विभागातील रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीच मान्यता मिळाली आहे

सहकार विभागात लिपिक टंकलेखन पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकाची 82 पदे अशी एकूण 448 पदांची भरती ही एमपीएससी मार्फत होणार आहे

घटक संवर्गातील 303 पदांकरिता होणार टीसीएस मार्फत भरती

गट ग संवर्गातील 303 जागांसाठी अतिप्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सोबत सहकारी विभागाने करार केला असून 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न्न श्रेणी लघुलेखक ,सहकार अधिकारी इत्यादी पदे राहणार आहेत

12

Leave a Comment