सत्यनारायण पूजा साहित्य यादी – Satyanarayan Pooja sahitya list in marathi pdf

सत्यनारायण पूजा साहित्य : सत्यनारायण व्रत कथा व पूजा साहित्य आपणास उपलब्ध करून देत आहे.

सत्यनारायण पूजा साहित्य यादी

  • देठासह विड्याची पाने १०
  • सुपार्या २४
  • नारळ ४
  • सुक्या खोबर्याच्या वाटीचे तुकडे ५
  • गुळाचे किंवा खडीसाखरेचे खडे ५ (गुळाचे खडे ठेवण्यासाठी)
  • केळीचे किंवा कर्दळीचे खांब २
  • आंब्याचे डहाळे कमीत कमी २ (एक दरवाजात बांधायला व एक कलशावर
  • पाट (किमान ) १ ठेवायला-उपलब्ध असल्यास)
  • तांबे २ ताम्हाणे २ लहान व २ मोठी ४
  • पंचपात्र १ गहू व तांदूळ किंवा फक्त तांदूळ १ किलो
  • संध्येच्या पळ्या(पूजेतल्या ) २ खण व पंचा (जुनी पद्धत)
  • जानवी जोड २ कापड(खण व पंचा याऐवजी-नवी पद्धत),
  • रुपयाची नाणी ६
  • समई (देवाकडे ) किमान १ देवाकडच्या समईवर उदबत्ती,
  • आरती काही पेटवायचे नाही.
  • म्हणून एक मोठे निरंजन वेगले पेटवून ठेवावे.
  • चौरंग (देवाच्या स्थापनेसाठी)
  • १ हार (ऐच्छिक -देवासाठी)
  • हातपुश्या
  • हळद, कुंकूं, गुलाल, अबीर, बुक्का (यातून जे उपलब्ध असेल)
  • अत्तर, रांगोळी, उदबत्ती, कापूर, धूप.
  • समई,
  • आरत्या/निरांजने,
  • वाती/फुलवाती.
  • फुले,
  • दुर्वा(४),
  • तुळशी(सहस्र तुळशी वाहणे असल्यास तेवढ्या निवडून मोजून वेगळ्या ठेवाव्या)
  • बदाम, खारका, जर्दाळू वगैरे पाच प्रकार(जुनी पद्धत-आता ऐच्छिक)
  • प्रत्येकी एक प्रमाणे पाच प्रकारची पाच फळे.(ऐच्छिक)
  • गंध उगाळून किंवा चंदन पावडरीची पेस्ट
  • अक्षता.
  • पंचामृत: दुध, दही, तूप, मध, साखर. प्रत्येकी छोट्या छोट्या वाट्यातून किंवा पाचही पदार्थांचे मिश्रण.
  • घण्टा,
  • बाळकृष्णाची किंवा श्रीविष्णूची मूर्ती.
  • फुलवाती तेलात भिजवून घातलेली निरांजने किमान तीन

( एक निरांजनाची आरती नैवेद्यापूर्वी व दोन निरांजानांची महाआरती नैवेद्यानंतर, शिवाय कापूर आरती वेगळी )

सत्यनारायण पूजा साहित्य यादी – Satyanarayan Pooja sahitya list in marathi pdf

See also श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ - Haripath

Leave a Comment