गणपतीची स्थापना कशी करावी ? श्री गणेश पुजा कशी करावी ? | Shri Ganesh Sthapna Puja

गणपतीची स्थापना कशी करावी : गणेश चतुर्थी ला श्री गणपती ची स्थापना केली जाते . श्री गणेश प्रथम पूजनीय आहे . सर्व विघ्न हरता आहेत . आज आपण श्री गणेशाची स्थापना कशी करावी ? गणपतीची पुजा Shri Ganesh Sthapna Puja कशी करायची त्याची काय विधी आहे हे सर्व यातून जाणणार आहोत . अजून भक्ति चे लेख पहाण्यासाठी –https://marathijobs.in

गणपतीची स्थापना कशी करावी ? श्री गणेश पुजा कशी करावी ? | Shri Ganesh Sthapna Puja
गणपतीची स्थापना कशी करावी ? श्री गणेश पुजा कशी करावी ? | Shri Ganesh Sthapna Puja

गणपती कोणता बसवावा?

गणपतीची सोंड

गणपतीच्या सोंडेच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असण्यालाही स्वतःचे महत्त्व आहे. असे मानले जाते की सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी गणपतीच्या उजव्या सोंडेची पूजा करावी आणि जर त्याला कोणत्याही शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर डाव्या बाजूच्या सोंडेची पूजा करावी

घरातल्या गणपतीची सोंड नेहमी उजवी बाजूस नसावी

जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी.

जर सोंड उजवीकडे असली तर

उजव्या सोंडेचे गणपतींकडे विशेष लक्ष्य ठेवावे लागतात, त्यांना फार सोळ्याची गरज असते.. आणि हे सर्व सोळं घरात होणे फारच अवघड असते म्हणून या सोंडीचे गणपती मंदिरात मिळतात. घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवावी.

गणपतीची स्थापना कशी करावी – Shri Ganesh Sthapna Puja

  • प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपण बाहेरून बाजारातून आणलेल्या मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे असा होतो म्हणजेच ती मूर्ति पूजनासाठी सजीव बनविणे होय
  • गणपतीची स्थापना करता वेळेस शुचिर्भूत म्हणजेच स्वच्छ (शक्‍य झाले तर पितांबर, धोतर) कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर पूर्व अगर पश्‍चिमेला तोंड करून पाटावर/आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा.
  • घरच्या देवांना (शक्‍यतो दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून) नमस्कार करावा.
  • घरातील वडीलधारी व्यक्तींना (सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना) नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसले पाहिजे
  • गणपतीची स्थापना कशी करावी

पंचामृत स्नान घालावे

  • दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताचे स्नान मूर्तीला (दूर्वांनी अगदी हळुवार शिंपडून) घालावे.
  • परत स्वच्छ पाण्याचे स्नान (दूर्वांनीच) घालावे.
  • पंचामृत स्नानाची सांगता सहाव्या गंधोदकाने (गंधाचे सुवासिक पाणी) करावी.
  • नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर फुलांनी सुवासिक अत्तर मूर्तीला लावावे.
  • गुलाबपाणी शिंपडावे. सुवासिक चाफा, गुलाब, सोनटक्का, जाई-जुई, केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दूर्वांची जुडी अष्टगंध, शेंदूर यांत बुडवून ही फुले, दूर्वा मूर्तीला वाहाव्यात.
  • फुले, दूर्वा यांच्या माध्यमांतूनच हळद, कुंकू इत्यादी परिमल (सुगंधी) द्रव्ये अर्पण करावी.
  • स्वच्छ पळी-भांड्यातील पाण्याने आचमन करून (तीन वेळा पोटात पाणी घ्यावे व चौथ्या वेळी हातावर पाणी सोडून उष्टा हात स्वच्छ करावा.)
  • प्राणायाम, गायत्री जपासह चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला दर्शनी कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या / सुपारीच्या गणपतीवर अक्षता व फुले वाहावी.
See also वट पोर्णिमा कथा मराठी PDF - Vat Pornima Katha Marathi PDF

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

अशी प्रार्थना करावी. मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे, असा संकल्प करावा.

शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्‌।
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।।

या मंत्राने समईच्या पायावर फळे, गंध, अक्षता वाहून “शत्रुबुद्धी’चा नाश व्हावा, अशी परमात्म्याजवळ प्रार्थना करावी. घंटेला गंध, फुले, अक्षता वाहावी. गणेशोत्सवात सज्जन लोक यावेत, राक्षसी वृत्तीचे, दुष्ट, गुंड पळून दूर जावेत यासाठी घंटा जोरात वाजवीत प्रार्थना म्हणावी,


आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम्‌।
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणम्‌।।


आता प्राणप्रतिष्ठा –

गणपतीची स्थापना कशी करावी – Shri Ganesh Sthapna Puja

मंत्र येत नसतील तर किमान ॐ गं । गणपतये नमः ।हा मंत्र म्हणत पुढील विधी करावी

  • पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे.
  • मूर्तीच्या हृदयावर (छातीच्या मध्यभागी) उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेशमूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत, अशी प्रार्थना करावी.
  • निदान 15 वेळा “ॐ‘काराचा जप करावा (यालाच “प्रणव’ म्हणतात.)
  • .देवस्य प्राणः । इह स्थितः । म्हणत श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत, त्यांची वाणी, मन, त्वचा, नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत, अशी प्रार्थना करावी
  • “श्रीं’च्या मूर्तीवर गंध, अक्षता, फुले पुन्हा वाहून गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा, नारळ यांवर पाणी सोडावे.
  • प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वांत महत्त्वाचा विधी पूर्ण होईल.

आता गणेश अथर्वशीर्ष म्हणावे –

ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि
त्वमेव केवलं कर्ताऽसि
त्वमेव केवलं धर्ताऽसि
त्वमेव केवलं हर्ताऽसि
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि
त्व साक्षादात्माऽसि नित्यम।।1।।

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।।

अव त्व मां। अव वक्तारं।
अव श्रोतारं। अव दातारं।
अव धातारं। अवानूचानमव शिष्यं।
अव पश्‍चातात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तातत्।
अवचोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात्।।
सर्वतो मॉं पाहि-पाहि समंतात।।3।।

See also प्रसाद हा मज द्यावा देवा - Prasad ha maj dyava deva Prathna

त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्माऽसि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारि वाक्पदानि।5।।

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं
त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम।।6।।

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्‍चान्त्यरूपं। बिन्दुरुत्तररूपं।
नाद: संधानं। स हितासंधि:
सैषा गणेश विद्या। गणकऋषि:
निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:।।7।।

एकदंताय विद्‌महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात्।।8।।

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम।
रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम।
रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम।।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात्परम।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।9।।

नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रमथपतये।
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।

गणपतीची स्थापना कशी करावी Shri Ganesh Sthapna Puja

आता श्री गणेशाची आरती म्हणावी –

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

सारांश :

गणपतीची स्थापना कशी करावी : श्री गणपती आपणास खूप आशीर्वाद देवो आपणास हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा . काही प्रश्न सूचना असेतील तर नक्की कॉमेंट करा . ॐ गं । गणपतये नमः ।

घरातल्या गणपतीची सोंड कोणत्या बाजूने असली पाहिजे ?

डाव्या बाजूने घरातल्या गणपतीची सोंड असली पाहिजे

गणपती ची स्थापना केव्हा करतात?

गणेश चतुर्थी ला श्री गणपती ची स्थापना केली जाते .

गणपती चा मंत्र कोणता आहे ?

ॐ गं । गणपतये नमः ।

  • शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

    शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

    शारदीय नवरात्री उत्सव 2023 : शारदीय नवरात्र उत्सव रविवार 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेचा मुहूर्त 2023 शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मूर्त सकाळी आठ दुपारी साडेबारा असा आहे यावेळी वातावरणात शुक्र बुध आणि चंद्र ग्रहाचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव राहणार शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे स्थापना करावी या दिवशी मातामह श्राद्ध असून … Read more


  • Download ganesh chalisa pdf Marathi

    Download ganesh chalisa pdf Marathi : श्री गणेश चालीसा पाठ ॥ दोहा ॥ जय गणपति सद्गुण सदन कविवर बदन कृपाल।विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल॥ ॥ चौपाई ॥ जय जय जय गणपति राजू ।मंगल भरण करण शुभ काजू ॥०१॥ जय गजबदन सदन सुखदाता ।विश्व विनायक बुद्धि विधाता ॥०२॥ वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन।तिलक त्रिपुण्ड … Read more


  • Shree Shiv Chalisa in Marathi PDF Download – श्री शिव चालिसा मराठी PDF

    Shree Shiv Chalisa in Marathi PDF Download – श्री शिव चालिसा मराठी PDF || दोहा || गणेशाचा जयजयकार करा |मंगल मुल सुजन ||कहात अयोध्या दास |तूं दे अभया वरदान || जय गिरिजा पति दिनदयाला |सदा करित संतां प्रतिपाला ||भला चंद्रमा सोहत नायके |कानन कुंडल नागफणी के॥ अंगा गौर शिरा गंगा बहये |मुंडमाला तन छरा लागे … Read more


  • Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी | हरतालिका स्थापना

    Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी : आज च्या लेखात आपण हरतालिका पुजा कशी करावी हे पाहणार आहे . हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.हरितालिका … Read more


  • वटसावित्रीची आरती व कथा

    वटसावित्रीची आरती व कथा

    वटसावित्रीची आरती : वटसावित्रीची आरती मराठीत आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहे . वटसावित्रीची आरती अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥ अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें कां प्रणीला ॥ आणखी वर वरी बाळें । मनि निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ॥ १ ॥ दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ भावें करीन मी … Read more


1 thought on “गणपतीची स्थापना कशी करावी ? श्री गणेश पुजा कशी करावी ? | Shri Ganesh Sthapna Puja”

  1. Pingback: - Marathijobs

Leave a Comment