तलाठी भरती चा अर्ज करण्यासाठी आज अखेरची संधी । अशी होणार तलाठी ची ऑनलाईन परीक्षा

तलाठी भरती चा अर्ज करण्यासाठी आज अखेरची संधी । अशी होणार तलाठी ची ऑनलाईन परीक्षा

नमस्कार मित्रांनो महसूल विभागातील महत्त्वाचा घटक म्हणजे तलाठी यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती तथापि 25 जुलै ही मुदतवाढीची अंतिम दिनांक असून आज ही दिनांक आहे म्हणूनच मित्रांनो अद्याप पर्यंत आपण तलाठी करिता अर्ज दाखल केला नसेल तर ही शेवट संधी असणार आहे यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे

तब्बल 12 लाख 52 हजार अर्ज दाखल

मित्रांनो तलाठी भरती करिता 4644 जागांकरिता तब्बल 12 लाख 52 हजार अर्ज दाखल झाले असून अजून आज अंतिम तारखेपर्यंत अर्ज वाढण्याची शक्यता आहे

टीसीएस घेणार ऑनलाइन दोन शिफ्ट मध्ये परीक्षा

अर्जाची संख्या पाहता ऑनलाईन परीक्षाही दोन किंवा तीन शिफ्ट मध्ये होऊ शकते. एका शिफ्ट मध्ये तब्बल 30000 विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात त्यामुळे तब्बल तलाठी भरतीची परीक्षा ही वीस दिवस चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

केव्हा होणार टीसीएस मार्फत ऑनलाईन तलाठी भरती परीक्षा 2023

मित्रांनो टीसीएस मार्फत लवकरच अर्जाची पडताळणी केल्यानंतर तलाठी भरती चा परीक्षा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये तलाठी ची परीक्षा टीचर्स मार्फत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

तलाठी भरतीसाठी कोणते विषय आहेत

मित्रांनो तलाठी भरतीसाठी 200 गुणांची प्रश्नपत्रिका असणार असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे यामध्ये नकारात्मक गुण नसणार त्यामुळे आपण संपूर्ण पेपर सोडवायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्हाला अभ्यास कराल मध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता असणार आहे या विषयावर सखोल अभ्यास करून तुम्ही तलाठी भरती मध्ये यश मिळू शकाल

See also राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती - State Excise Bharti Update

Leave a Comment