तलाठी भरती झाली सुरू अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 दोन दिवसात तब्बल 30000 हून अधिक अर्ज दाखल

तलाठी भरती : नमस्कार मित्रांनो महसूल विभागामधील तलाठी पदासाठी अर्ज प्रक्रिया 26 जून पासून सुरू झाली आहे राज्यामध्ये तब्बल 4644 पदांसाठी ही पदभरती होत आहे

IMG 20230628 105004 535
तलाठी भरती

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले असून तब्बल 30000 उमेदवारांनी दोन दिवसांमध्ये अर्ज सादर केले आहे अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती म्हणूनच जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 जुलै पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून अर्ज सुरुवात झाल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चार वाजेपर्यंत तीस हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत

तलाठी भरतीसाठी अर्ज लाखात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

तलाठी पदासाठी परीक्षा पद्धत कशी असणार

तलाठी पदासाठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर टीसीएस या कंपनीमार्फत होणार आहे पेपरात 200 गुणांचा असणार आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे व यामध्ये नकारात्मक गुण पद्धत नसणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण व बुद्धिमत्ता अंकगणित यावर पेपर असणार आहे विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने TCS मार्फत घेण्यात आलेल्या पेपरचा सराव करणे आवश्यक आहे

तलाठी पदभरती साठी तब्बल हजार रुपये परीक्षा शुल्क

शासन तलाठी भरतीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तिच्या माध्यमातून पैसा वसूल करत आहे तब्बल हजार रुपये फी खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आली असून मागासवर्गीयांना फक्त शंभर रुपयाची सूट दिली आहे म्हणजेच त्यांना 900 रुपये फीस भरावी लागत आहे एस एस सी मार्फत होणाऱ्या परीक्षेत केंद्र सरकार फक्त शंभर रुपये फी घेत असते मात्र राज्य सरकार या परीक्षेत तब्बल हजार रुपये फी देत आहे त्यामुळे उमेदवार वर आर्थिक बोजा पडत आहे

ऑनलाइन पद्धतीने तलाठी साठी अर्ज कोठे करावा

अर्ज करण्यासाठी महाभुमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करताना तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी दहावीची मार्कशीट नुसार तुमचे नाव टाकावे अनिवार्य आहे तरी संबंधित जाहिरात संपूर्णपणे वाचून लक्षपूर्वक अर्ज सादर करावे अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिली आहे

Leave a Comment