tukaram abhang with meaning in marathi

tukaram abhang with meaning in marathi

tukaram abhang with meaning in marathi

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥
मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

अर्थ

अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे आहे .त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते .मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे .तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अर्थ

हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .

महारासी शिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥

अर्थ

See also रक्षाबंधन 2023 दिनांक मुहूर्त - Raksha bandhan Muhart 2023

ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्रांम्हण म्हणू नये .त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही .आशा मनुष्याचा चांडाळास देखिल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते .तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्‍या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखिल त्याच जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते .

Leave a Comment