Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती

Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण विराम चिन्ह या मराठी व्याकरण भागाचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळी विरामचिन्हे वापरत असतो परंतु आपणास कोणते चिन्ह ला काय म्हणतात हे माहीत नसते तर त्याचे उत्तर या लेखात आम्ही आपणास देऊ जेणेकरून प्रत्येक विरामचिन्ह व त्याचं नाव काय आहे आणि ते दिसायला कसे दिसते हे सर्व तुम्हाला या लेखातून मिळेल

Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती
Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती

Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती

विरामचिन्हांचा उपयोग

मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये बऱ्याचदा आपल्याला वाक्यामध्ये कुठे थांबायचं असते किंवा आपल्याला समोरच्याला उद्देशून काही बोलायचं असते किंवा भावना व्यक्त करायचे असतील तेव्हा वाक्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होण्यासाठी आपल्याला विरामचिन्हांचा उपयोग करावा लागतो

विरामचिन्हांचे प्रकार

विरामचिन्हाचे एकूण 13 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहेत

 1. पूर्णविराम (.)
 2. अर्धविराम (;)
 3. स्वल्पविराम (,)
 4. अपूर्ण विराम (:)
 5. प्रश्नचिन्ह (?)
 6. उद्गारचिन्ह (!)
 7. अवतरण चिन्हे
 8. संयोग चिन्ह (-)
 9. अपसारण चिन्ह (-)
 10. लोप चिन्ह (…)
 11. दंड (एकेरी ।, दुहेरी ।।)
 12. अवग्रह (ऽ)
 13. विकल्प चिन्ह (/)

1. पूर्णविराम (.) FullStop

वाक्य पूर्ण झाले आहे दर्शनासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम (.)वापरतात

उदाहरण.

 1. मी उद्या गावाला जाणार आहे.
 2. उद्यापासून शाळा सुरू होणार आहे.
 3. ती लवकर उठत नाही.
 4. आज सूर्यग्रहण आहे.
 5. माझी पॉलिसी आहे.
 6. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे.

2. अर्धविराम (;)

जेव्हा एखादा वाक्य मध्ये अल्पविराम पेक्षा जास्त तसेच पूर्णविराम पेक्षा कमी वेळासाठी थांबावे लागते अशा वाक्याला अर्धविराम असे म्हणतात

जेव्हा एका वाक्याचे दुसऱ्या वाक्या सोबत संबंध दर्शवायचे असल्यास अर्धविराम चा उपयोग केला जातो

दोन छोटी उभयानवी अवयव जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात

उदाहरणार्थ

 • राजू खूप चांगला मुलगा आहे ; पण त्याची संगत चांगली नाही
 • रूपा अभ्यासात हुशार आहे ; पण ती अभ्यास करत नाही
See also [Chart + PDF] बाराखडी मराठी - Barakhadi in Marathi | marathi barakhadi in english | marathi barakhadi chart | marathi barakhadi pdf | मराठी बाराखडी चार्ट | barakhadi marathi

वरील वाक्यात पण हे उभयान्वयी अवयव वापरण्यात आलेले आहे

 • मी स्वयंपाक करते ; तोवर तू अभ्यास करून घे

दोन संयुक्त वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम वापरण्यात आलेले आहे

3. स्वल्पविराम (,)

एखाद्या वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द किंवा दोन पेक्षा अधिक शब्द आले असता स्वल्पविराम वापरल्या जाते

वाक्याच्या सुरुवातीला जर संबोधन आले असेल तर स्वल्पविराम वापरले जाते

उदाहरणार्थ –

 • घरामध्ये गहू ,तांदूळ, बाजरी, डाळ ही कडधान्य आहेत
 • पुस्तक,पेन,वही व दप्तर घेऊन शाळेत जा
 • घरी येताना बाजारातून तिखट, मीठ, साखर, तांदूळ, तेल , तूप घेऊन ये
 • मित्रांनो , उद्या क्लासला सुट्टी राहील

4. अपूर्ण विराम (:)

जेव्हा कोणत्या शब्दाला वेगळे दर्शवयाचे असल्यास अपूर्णविराम वापरल्या जाते

उदाहरणार्थ –

 • प्रदूषण : एक अभिशाप ।
 • कृष्णाची अनेक नावे आहेत : मोहन, गोपाल, गिरीधारी, इत्यादी

5. प्रश्नचिन्ह (?)

जेव्हा आपणास इतर कोणास काही विचारायचे असेल किवा सूचना कराची असेल तेव्हा आपण त्यास प्रश्न विचारतो प्रश्नाची शेवट ही प्रश्नचिन्ह दर्शवून केली जाते.

उदाहरणार्थ –

 • राहुल एक ग्लास पाणी आण ?
 • तुझ्याकडे शंभर रुपये आहेत का?
 • तू मला मदत करशील का?
 • तू हे काम करशील का?
 • तू अभ्यास करशील का?
 • तू माझे पैसे बँकेत भरशील का?

6. उद्गारचिन्ह (!)

एखाद्या वाक्यातील आपल्याला उत्कट भावना आनंद दुःख आश्चर्य भीती व्यक्त करायची असल्यास या उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग केला जातो

उदाहरणार्थ –

 • शाब्बास! खूप छान काम केलेस तू
 • अरे अरे! खूप वाईट झाले
 • अरे बापरे! किती मोठा साप
 • शाब्बास! असा छान अभ्यास कर
 • अरेरे! खूप वाईट झाले
 • वा! किती छान रंगवलं तू
 • छान! हीच खरी मानवता

7. अवतरण चिन्हे

महत्वपूर्ण वाक्य लिहिण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी जे संकेत चिन्ह वापरल्या जाते त्याला अवतरण चिन्ह असे म्हणतात

अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह

See also मराठी म्हणी व त्यांचे अर्थ - Marathi Mhani Meaning Arth

एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात?

एकेरी अवतरण चिन्ह चा उपयोग एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी केला जातो

उदाहरणार्थ

तुलसीदास रचित ‘रामचरितमानस‘ प्रमुख कृती आहे

दुहेरी अवतरण चिन्ह चा उपयोग केव्हा केला जातो?

एखाद्याचे वाक्य आपणास वापरायचे आहे तेव्हा आपण त्यास दुहेरी अवतरण चिन्ह मध्ये लिहितो.

उदाहरणार्थ

संत कबीरांनी म्हटले

“निंदक नियरे रखीये अंगणकुटीछवाय”

8. संयोग चिन्ह (-)

दोन शब्दांमधील संयोग दर्शवण्यासाठी संबंध दर्शवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर करतात

संयोग चिन्ह वाक्य – दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह उदाहरण

 • राम-शाम
 • हरे – राम
 • हरि-हर
 • गंगा -जमुना
 • गुलाब -जामून
 • हरे -कृष्ण
 • राधे-राधे

9. अपसारण चिन्ह (-)

वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या बाबीचा आपणास खुलासा किंवा स्पष्टीकरण द्यायच्या असेल तेव्हा अपसारण चिन्ह (-) वापरतात

उदाहरणार्थ – अपसरण चिन्ह वाक्य

 • उदाहरणार्थ –
 • ती मुलगी – जी जिल्ह्यात प्रथम आली
 • ती गाडी – याला बक्षीस मिळाली
 • हे घर – याने विकत घेतले

10. लोप चिन्ह (…)

जेव्हा एखाद्या वाक्याचा काही भाग आपल्याला सोडून ते वाक्य लिहायचं असेल तर तेव्हा लोप चिन्ह म्हणजे डॉट डॉट चा उपयोग केला जातो

 • परीक्षेची वेळ आली आहे आता…..
 • मी हे करणारच …..

काही ओव्या आपल्याला वगळाव्या असतील तेव्हा लोप चिन्ह वापरतात

 • मंगल भवन अमंगल हारी द्रवो सुधर अजीर बिहारी …..

वाक्यामधील काही शब्द आपल्याला लपवण्याकरिता

 • देशाचे नेतृत्व आज …….. हाती आहे

लोप चिन्ह रिकाम्या जागा दर्शवण्यासाठी वापरतात

 • भारत हा ……. देश आहे
 • मी पण तुमच्या सोबत फिरायला आलो असतो पण …….

FAQ – Viram Chinh In Marathi | विरामचिन्ह मराठी संपूर्ण माहिती

Leave a Comment