विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती । कर्ज व्याजदर प्रशिक्षण

देशातील लाखो छोट्या व्यवसायिकांना कौशल्य प्रशिक्षण सह आर्थिक हातभार देण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेद्वारे एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज पाच टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाणार असून सरकार या योजनेवर पाच वर्षात 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे यातून तब्बल तीस लाख कुटुंबांना थेट फायदा होणार

विश्वकर्मा योजनेमध्ये व्याजदर किती असणार

विश्वकर्मा योजनेत एक लाख रुपया पर्यंतचे कर्ज हे 5% व्याजदराने सरकार देणार

विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा घ्याल

तीस लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेचा थेट फायदा होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे या योजनेअंतर्गत बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन प्रकारचे कौशल्य दिले जाणार

या योजनेमध्ये सरकार प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधनही देणार असून नवीन साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15000 रुपयाची मदत सुद्धा करणार आहे कामगारांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा दिले जाणार एका लाखाच्या कर्जानंतर पुढील टप्प्यात दोन लाखांचे कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाईल यावेळी सरकार ब्रँडिंग ऑनलाईन मार्केट ॲक्सेस यासाठी मदत करेल प्रथमच 18 पारंपारिक व्यापारांचा याच्यामध्ये समावेश केला गेला आहे

See also आयुष्यमान भारत आरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून तब्बल 1900 आजारांवर होणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

Leave a Comment