WHO चा निधी अमेरिकेने रोखला

WHO चा निधी अमेरिकेने रोखला

जगभरात 1 लाख 27 हजार 594 जणांचा मृत्यू : संयुक्त राष्ट्राकडून अमेरिकेच्या निर्णयावर निराशा व्यक्त

DONALD%2BTRUMP

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 14 हजार 9 वर पोहोचली आहे. तर एकूण बळींचा आकडा 1 लाख 27 हजार 594 झाला आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत 4 लाख 91 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला असून हा निर्णय धोकादायक असल्याची प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे.

तर डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याची ही योग्य वेळ नसल्याचे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी काढले आहेत.

कोरोना फैलाव रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेचा निधी रोखला आहे.

See also COPA TEST – 3rd Operating system

Leave a Comment