महाराष्ट्र ऑनलाइन सात बारा महाभुलेख 7/12 : नामस्कर माझ्या शेतकरी मित्रांनो आज च्या लेखात आपण महाराष्ट्र ऑनलाइन सात बारा 7 12 [7 12 Download] कसा काढावा याबाबत सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती घेणे आहोत . अधिक अपडेट – https://marathijobs.in
महाभूलेख (सात बाराचा उतारा) – सात बारा म्हणजे काय ?
मित्रांनो, सात बारा उत्तर्यावर आपल्या शेतीची व पिकाची नोंद असते . महाराष्ट्र सरकारने आता सात बारा ऑनलाइन केला असल्यामुळे आपण स्वता आपल्या मोबाइल किवा कम्प्युटर द्वारे घरी बसून 7/12 काढू शकता
मित्रांनो , वरील दिल्या प्रमाणे सात बारा असतो
सात बाराचा उतारा म्हणजे तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती होय . आपणास 7 12 वरुण त्या जमीन ची खालील प्रमाणे माहिती मिळे
- भूमापन क्रमांक व उपविभाग ,
- गावाचे नाव, तालुका व जिल्हा
- खाता क्रमांक
- जमीन मालक नाव
- जमिनीचे क्षेत्रफळ,
- जमिनीचा इतिहास
- कुळ खंड व इतर अधिकार [बँक बोजा नमूद असतो ]
गाव नमूना सात माहिती :-
तलाठी हा सात बारा च्या नोंदी ठेवत असतो . या नोंदी ठेवण्यासाठी तो वेगवेगळे रजिस्टर वापरतो . या वह्यांना अनुक्रमांक दिले असतात त्यास ‘गाव नमूना ‘ असे म्हटले जाते
तलाठी गाव नमूना 7 व नमूना 12 मधील माहिती एकत्र करून 7/12 देत असतो . म्हणून सात बारा म्हटले जाते .
7 12 ची ही तपासणी करीत मागे जावे. या तपासणीची अखेर शेतवार पत्रक म्हणजे सूडपत्रक वा कडई पत्रका पर्यंत मालकी हक्काचा शोध आपण घेऊ शकतो .
७/१२ उतारा हे दोन गाव नमुने आहेत. ७ व १२ हे दोन मुख्य भाग (नमुने) एकाच कागदावर असतात म्हणून त्याला ‘सात बारा’ म्हणतात. आता ऑनलाइन साता बारा वर पिकांची माहिती चा भाग मागच्या बाजूने प्रिंट देतात तो गाव नमूना 12 होय . समोरील भाग नमूना सात होय .
हे पण वाचा –
गाव नमूना बारा माहिती :-
जमीनमालकास स्वत:कडे असलेली जमीन किती आणि कोणती हे दाखविणारा सात बारा हा एक कागद आहे. जमिनीची मालकी, कब्जा वहिबाट, वा अन्य अधिकार हा उतारा दाखवितो. या उताऱ्याप्रमाणे जमिनीवरील भोगवट्यास पोलीस ब महसूल खात्याकडून संरक्षण मिळते. नेहमी उपयोगी पडणारा हा उतारा असल्याने प्रत्येक जमीनमालकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
७ अ /7A नमूना माहिती :-
7 12 च्या उताऱ्यामध्ये ‘७ अ’ नमुन्याचा समावेश असतो. हा नमुना कुळवहिवाटीची माहिती देतो वरील छायाचित्रात तुम्ही पाहू शकता .
सात बारा मधील विविध भाग :-
१) गाव नमूना सात अधिकार व अबिलेख पत्रक)
- उताऱ्याच्या डाव्या बाजूस जमिनीची भूमापन/सर्व्ह/गट नंबर व हिस्सानंबर दाखविलेला असतो.
- भोगवटादार वर्ग १ – असे तुमच्या सात बारा वर असेल तर ही जमीन पूर्वापार वंशपरंपरेने चालत आलेली असून , ‘मालकी’ हक्क असलेली स्वत:ची जमीन आहे.
- भोगवटादार वर्ग २ – सरकारने भूमिहीनांना किंबा अल्प भू धारकांना कसण्यासाठी दिलेली जमिनी या प्रकारात मोडतात जिल्हाधिकार्यांनी परवानगी शिवाय जमीन विकता येत नाही .
- भोगवटादार वर्ग ३ -सरकारने भाडेपट्ट्याने बा विशिष्ट शर्ती अर्टीबर विशिष्ट कामांसाठी, विशिष्ट मुदतीसाठी दिलेली भू धारण पद्धती जमीन वर्ग 3 मध्ये मोडते.
महाभूलेख सात बारा 7/12 maharashtra
महाराष्ट्र सात बारा पोर्टलचे नाव | भूमी अभिलेख (महाभुलेख) Mahabhulekh |
पोर्टलचे सुरुवात | महाराष्ट्र सरकारने |
पोर्टलचे उद्देश | महाराष्ट्रातील सातबारा आणि जमिनीशी संबंधित ऑनलाइन माहिती मिळवण्यासाठी |
पोर्टलचे निर्माण | राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) आणि महाराष्ट्र महसूल विभाग |
पद्धत | ऑनलाइन |
संकेतस्थळ 1 | mahabhulekh.maharashtra.gov.in |
महाभुलेख जिल्हानिहाय जमीन अभिलेख संबंधित लिंक-
विभाग | जिल्हे | अधिकृत वेबसाइट दुवे |
नाशिक | नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार | इथे क्लिक करा |
पुणे | पुणे, सातारा, सोलापूर, सांगला, कोल्हापूर | इथे क्लिक करा |
नागपूर | नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया | इथे क्लिक करा |
औरंगाबाद | औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बिड, परभणी | इथे क्लिक करा |
कोकण | पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर | इथे क्लिक करा |
अमरावती | अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ | इथे क्लिक करा |
mahabhulekh पोर्टल ऑनलाइन 7/12 सात बारा काढण्याच्या स्टेप्स [7 12 Download]
आता शेतकरी बंधु व इतर नागरिक यांना कोणत्याही कार्यालयात न जाता त्यांना सात बारा मोबाइल द्वारे किवा कम्प्युटर द्वारे घरी बसून काढता येणार . त्यासाठी पुढे डेलेल्या सर्व स्टेप्स काळजी पूर्वक फॉलो करा
स्टेप 01 . सर्वात आधी Google वर या त्यात टाइप करा 7/12 तुमच्या समोर ही सरकारी वेबसाइट येईल Bhulekh mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा .
या वेबसाइट ची लिंक — bhulekh.mahabhumi.gov.in आहे .
Step 2. आता तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज उघडते, जिथे तुमच्यासमोर महसूल विभाग येतात – पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि अमरावती, तुम्हाला तुमची जमीन ज्या महसूल विभागात आहे तो विभाग निवडावा लागेल.
स्टेप 3. पर्याय निवड नंतर GO च्या पर्यायावर क्लिक करा .
स्टेप 4. त्यानंतर तुमच्या समोर 7/12 आणि 8A व मालमत्ता पत्रक चा पर्याय येईल, दिलेल्या ऑप्शन मधून सात बारा ची निवड करा .
स्टेप 5. नंतर, तुमचा जिल्हा , तालुका , व गाव निवडा
स्टेप 6. आता सर्वेक्षण क्रमांक/ गट क्रमांक/ अक्षरी सर्वेक्षण क्रमांक/ गट क्रमांक / पहिले नाव / आडनाव / मधील नाव / संपूर्ण नाव पैकी कोणतेही एक सिलेक्ट करा व मोबाइल नंबर कोणताही चालते तो टाका व आणि शोध पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 7 . आता तुम्ही दिलेल्या सर्वेक्षण क्रमांक/ गट क्रमांक/ अक्षरी सर्वेक्षण क्रमांक/ गट क्रमांक / पहिले नाव / आडनाव / मधील नाव / संपूर्ण नाव नुसार 7/12 सात बारा तुमच्या समोर सात बारा उपलब्ध झाला असेल .
अशा प्रकारे तुमची 7 12 ऑनलाइन काढायची प्रक्रिया पूर्ण होईल. हा सात बारा फ्री मध्ये ऑनलाइन काढता येतो .
परंतु डिजिटल साइन असलेला 7 12 करिता असलेली प्रोसेस थोडी वेगळी आहे ती आता आपण पाहूया .
7 12 online Maharashtra साठी जिल्हा प्रशासन लिंक
How to download digitally signed 7 12 – डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12 डाउनलोड कसा करावा
मित्रांनो आपण महाभूलेख च्या अधिकृत वेबसाइटवर डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12 सातबाराऑनलाइन कसा डाउनलोड करायचे ते सांगतो.
डिजिटल स्वाक्षरी 7 12 ऑनलाइन कसा काढावा त्याच्या स्टेप्स ?
स्टेप 1. सर्वप्रथम आपण डिजिटल सात बारा च्या अधिकृत वेबसाइट वर जावे येथे डिजिटल सातबाराच्या अधिकृत वेबसाइटवर जाhttps://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
स्टेप 2- वर फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे आता पोर्टलवर लॉग इन करा, लॉगिन नसेल तर तुम्ही आधी New User Registration करा.
स्टेप 3-लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय दिली आहेत – लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून नियमित लॉगिन किंवा मोबाइल नंबर आणि ओटीपीद्वारे.
स्टेप 4-आता लॉगिन झाल्यावर तुम्ही जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे नंबर/गेट नंबर यासारखे तपशील प्रविष्ट करा
तुमच्या खात्यात कमीत कमी 15 रुपये असले पाहिजे तरच सात बारा डाऊनलोड होईल व तुमचे पैसे काततिल
स्टेप 5-डाउनलोड वर क्लिक करा
तुम्ही फाइल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या बॅलेन्स मधून त्याचे पेमेंट 15 रुपये कापले जाईल.
तुम्हाला pdf स्वरुपात डिजिटल 7 12 मिळून जाईल
Satbara ( 7/12 ) Utara Maharashtra – सातबारा उतारा App – गूगल playstore
सात बारा app सुद्धा आपण आपल्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला खाली देत आहोत .
About this app
Fastest and easy way to get information of satbara ( 7/12 ) utara / bhumi abhilekh from mahabhulekh of Maharashtra. Using satbara 7/12 app land users can get survey number of the land, Land owner name, the area of the land, the type of cultivation (irrigated / rain fed).
7 12 App लिंक —
https://play.google.com/store/apps/details?id=com.mobile.mahabhumi&hl=en_IN&gl=US
maharashtra jamin mahsul adhiniyam 1966 in marathi pdf
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 pdf डाऊनलोड – लिंक
सारांश :-
या लेखाद्वारे, महाराष्ट्र भूमी अभिलेख 7/12 शी संबंधित सर्व महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की आमच्याद्वारे दिलेली माहिती तुम्हाला मदत करेल. तुम्हाला या संबंधी इतर माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
7 12 ऑनलाइन कसं चेक करावा ?
स्टेप 01 . सर्वात आधी Google वर या त्यात टाइप करा 7/12 तुमच्या समोर ही सरकारी वेबसाइट येईल Bhulekh mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा . येथून तुम्हाला 7 12 चेक करता येईल .
डिजिटल 7 12 व साधा 7 12 काय फरक असतो ?
डिजिटल 7 12 हा सरकारी कामा साठी जसे खरेदी विक्री , कर्ज इत्यादि कार्यालयीन कामासाठी वापरता येतो. परंतु साधा 7 12 वर सही नसल्याने तो चालत नाही.
डिजिटल 7 12 ची अधिकृत वेबसाइट आहे ?
स्टेप 1. सर्वप्रथम आपण डिजिटल सात बारा च्या अधिकृत वेबसाइट वर जावे येथे डिजिटल सातबाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
जमिनीचे रेकॉर्ड कोठे पाहाला मिळेल ?
Bhulekh mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा . येथून तुम्हाला 7 12 चेक करता येईल .
7 12 डिजिटल किती रूपात ऑनलाइन मिळतो ?
15 रुपयात तुम्ही ऑनलाइन सॉफ्ट कॉपी मिळते डिजिटल सात बाराची मिळते
फ्री मध्ये सात बारा कसा व कोठे मिळेल ?
त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी Google वर या त्यात टाइप करा 7/12 तुमच्या समोर ही सरकारी वेबसाइट येईल Bhulekh mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा . येथून तुम्हाला 7 12 चेक / डाऊनलोड करता येईल . त्यावर सही नसेल वर स्टेप्स दिल्या आहे.
प्रॉपर्टि कार्ड कोठे ऑनलाइन काढता येईल
स्टेप 1. सर्वप्रथम आपण डिजिटल सात बारा च्या अधिकृत वेबसाइट वर जावे येथे डिजिटल सातबाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr येथे प्रॉपर्टी कार्ड पर्याय आहे त्यातून तुम्हाला प्रॉपर्टि कार्ड काढता येईल