सरकारी नोकरी Update – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारमार्फत जोरदार सरकारी नोकरी भरती मोहीम सुरू आहे त्यातच भर म्हणून आता राज्यातील सरकारी रुग्णालय तसेच दंत महाविद्यालयामधील तब्बल 13391 पदे रिक्त असून आयुर्वेदिक महाविद्यालयात 876 पदे रिक्त आहेत
यामध्ये गट अ व गट ब मधील पदे ही सरळसेवेने तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असून वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे
राज्यातील रुग्णालयात रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले सरळसेवेने अद्याप पर्यंत प्राध्यापक स्वर्गातील 91 पदे सहाय्यक प्राध्यापक स्वर्गातील 525 पदे भरण्यात आली आहे तसेच 117 अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे
गट क संवर्गतील 5180 पदे भरण्याकरिता टीसीएस आयओएन या कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली
गट ड संवर्गातील पदे भर जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहे त्या अनुषंगाने संबंधित संस्थेची अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले
दंत महाविद्यातील रिक्त पदे
अधिष्ठाता आठ पदे, प्राध्यापक २४५ पदे, सहयोगी प्राध्यापक 400 पदे ,सहाय्यक प्राध्यापक १००८ पदे, घटक 756 पदे, गट ड 3947 पदे एकूण 13391 पदे
सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालय रिक्त पदे
अधिष्ठाता दोन पदे ,प्राध्यापक 26 पदे ,सहयोगी प्राध्यापक ४४ पदे ,सहाय्य प्राध्यापक ८६पदे, गटक 510 पदे, गट ड 210 पदे एकूण 876 पदे